धक्कादायक ! सिगरेट न दिल्याचं निमीत्त, आरोपीने दुकानदाराची गळा चिरुन केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पालघर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानदाराने सिगरेट देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याची गळा चिरुन हत्या केली आहे. विनोद कुमार सिंह असं या दुकानदाराचं नाव असून आरोपीने विनोद कुमारचा मुलगा आणि त्याच्या काकांनाही मारहाण करत गंभीर जखमी केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार सिंग यांचं पालघरच्या बोईसर परिसरात पान टपरीचं दुकान आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान, आरोपी विनोद यांच्या दुकानावर सिगरेट मागण्यासाठी आला. परंतू विनोद यांनी आता दुकान बंद झालं आहे असं सांगत सिगरेट देण्यासाठी नकार दिला. यानंतर आरोपी आणि विनोद यांच्यात वाद झाला आणि कालांतराने आरोपी घटनास्थळावरुन निघून गेला.

मुंबईत दुहेरी हत्याकांड, 89 वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या

हे वाचलं का?

परंतू काहीवेळाने आरोपी परत आला आणि त्याने आपल्याजवळ असलेल्या लाठी-दांडक्याने दुकानाचं शटर तोडून आत शिरत तोडफोड केली. यावेळी आरोपीने विनोद सिंग यांच्या मुलाला आणि काकांना मारहाण केली. आरोपीने विनोद यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेतील तिघांना यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबईतील बेपत्ता तरुणीचा मृतदेह पालघरमध्ये सापडला, प्रियकर अटकेत

ADVERTISEMENT

यावेळी उपचारादरम्यान विनोद सिंग यांचं निधन झालं. पालघर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सीसीटीव्हीच्या आधारावर आठ आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील दोन जखमींवर नालासोपाऱ्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

सख्खा मित्र झाला पक्का वैरी! १०० रूपयांसाठी पाईपने गळा आवळून मित्राला संपवलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT