अनिल देशमुखांच्या मुलासह उपमुख्यमंत्री अजित पवार गडकरींच्या भेटीला, वळसे पाटीलही सोबत

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र आज त्यांचा मुलगा सलील देशमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपुरात जाऊन नितीन गडकरींची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी ही भेट झाली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र आज त्यांचा मुलगा सलील देशमुख, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपुरात जाऊन नितीन गडकरींची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी ही भेट झाली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तब्बल दोन तास नितीन गडकरी आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा, राजकीय भेट नसल्याची गडकरींची माहिती

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली कऱण्याचे आरोप झाले. त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी आरोपांप्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्यानंतर १ नोव्हेंबरला ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. त्याचवेळी त्यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याआधी ईडी आणि आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्या घरी छापेही मारले होते. आता आज अचानक अजित पवार, अनिल देशमुख यांचा मुलगा सलील आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नितीन गडकरींची भेट घेतली आहे.

नितीन गडकरींची भेट या तिघांनी घेतल्यानंतर नागपुरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

नागपूरमध्ये आज पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. परंतू या कार्यक्रमाला निमंत्रण पत्रिकेच्या वादावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित राहणं टाळलं.

२०१८ मध्ये नागपूर येथील पोलीस भवनाच्या कार्यालयासाठी 110 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केले होते. त्या फडणवीसांचं नाव पत्रिकेत कुठेही छापलेलं नसल्यामुळे हा फडणवीसांचा अपमान असून महाविकास आघाडी सरकार द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला होता.

आजच्या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरींच्या अनुपस्थितीमुळे वादाची किनार लाभल्यानंतर अजित पवार आणि वळसे-पाटलांनी गडकरींची घेतलेली भेट आणि राजकीय विषयावर झालेल्या चर्चा ही महत्वाची घडामोड मानली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp