मिलिंद देवरांच्या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर
महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत अनप्रेडिक्टेबल झालं आहे. राजकारणात काय होईल याचा अंदाजच लावता येत नाही अशा काही घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. अशात घटनांमध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेलं पत्र. एवढंच नाही तर या पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत अनप्रेडिक्टेबल झालं आहे. राजकारणात काय होईल याचा अंदाजच लावता येत नाही अशा काही घटना मागच्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. अशात घटनांमध्ये एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेलं पत्र. एवढंच नाही तर या पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तसंच हेच पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्देशून लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली असून शिवसेनेने त्यांच्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचं म्हटलं आहे. त्याचा आपण फेरविचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
My letter to @mieknathshinde ji & @Dev_Fadnavis ji urging them to nullify @mybmc’s recently concluded ward-wise delimitation & reservation.
Mumbai’s wards were gerrymandered in violation of MVA’s coalition Dharma to benefit @ShivSena.
Mumbaikars deserve free & fair elections. pic.twitter.com/1ozXCvjNjg
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) July 13, 2022
मिलिंद देवरा यांनी काय म्हटलं आहे?
मिलिंद देवरा यांनी मागच्या अडीच वर्षात पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. मुंबई तकशी साधलेल्या संवादात मिलिंद देवरा म्हणाले की, मुंबई महापालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका योग्य पद्धतीने घेतल्या पाहिजेत. मुंबईच्या महापालिका निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्ड रचना बदलणं कितपत योग्य आहे? ही बाब घटनेच्या विरोधात आहे त्यामुळेच मी पत्र लिहिलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन मुंबईतल्या प्रभाग रचनेसाठी नवी रचना करण्याची मागणी करावी. अशी मागणी मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.