kirtikumar bhangdiya: फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदारावर गुन्हा, प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bunty bhangdiya case file in police station : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचे अत्यंत निकटवर्तीय चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट शेअर करणाऱ्या साईनाथ बुटके (Sainath Butke) यांना घरात घूसून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता आमदार बंटी भांगडिया आणि साईनाथ बुटके यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (devendra fadnavis close relatives bunty bhangdiya case file in chimur police station)

चंद्रपुरचे चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya)यांच्या विरोधात अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.हा मजकूर साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके (Sainath Butke) यांनी वायरल केला होता. या मजकूरावर आमदार भांगडिया चांगलेच भडकले होते. या रागाच्याभरात आमदार बंटी भांगडिया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी गेले व त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली.शेकडोच्या जमावासमोर हा प्रकार घडला होता.

Dombivli: राम मंदिराच्या पुजाऱ्याला भाजप माजी नगरसेवकाच्या मुलाने केली शिवीगाळ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेनंतर साईनाथ बुटके (Sainath Butke) यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले होते. मात्र आमदार बंटी भांगडिया व साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांनी एकमेकांच्या विरोधात चिमूर पोलीस स्टेशन तक्रारी दाखल केल्या. या तक्रारीवर दोन्ही पक्षावर गुन्हे नोंद करण्यात आले. आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) यांच्या तक्रारीवरून साईनाथ बुटके यांच्यावर अश्लील शिवीगाळ करणे, संगणकीय प्राताधिकार भंग गुन्ह्याबरोबर भांदवी २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गोळा करून घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर भादवी कलम १४३,१४७,१४९,४५२,३२३,३५४,२९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चिमुर वासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?

ADVERTISEMENT

आमदार बंटी भांगडिया (Bunty Bhangdiya) हे भाजपा पक्षाचे आहेत तर साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही.मात्र त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तद्वतच ते माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत.या प्रकरणात अजून पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

Japanese Girl Holi : संतापजनक! रंग लावण्याच्या बहाण्याने फॉरेनरसोबत अश्लील कृत्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT