मी अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही वेगळाच अर्थ काढाल: देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis: मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (9 मार्च) सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला. यावेळी या अर्थसंकल्पाचा मांडणी ही पंचामृत ध्येयावर करण्यात आली. पाच महत्त्वाच्या मुद्दे मांडत देवेंद्र फडणवीस यांनी आपला अर्थसंकल्प मांडला. मात्र, यावेळी त्यांनी शेवटच्या मुद्दाकडे वळताना जी टिप्पणी केली त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकला. (devendra fadnavis made a funniest comment while presenting the budget)

ADVERTISEMENT

‘मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे…’

देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृताच्या आधारे आपल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या अमृतातील मुद्द्यांचं विश्लेषण केलं. पण जेव्हा ते शेवटच्या अमृताकडे म्हणजे पंचामृताकडे वळले तेव्हा असं काही घडलं की, संपूर्ण सभागृह हे खळखळून हसलं..

त्याचं झालं असं की, देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृता पैकी चार मुद्दे विशद केल्यानंतर ते पाचव्या मुद्द्याकडे वळले. त्यावेळी ते असं म्हणाले की, ‘यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडे वळतोय.. पंचम अमृत..’

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस म्हणताच विरोधकांनी ‘पंचामृत.. पंचामृत..’ असं जोरजोरात म्हणत फडणवीसांना दुरुस्ती करण्यास सांगितलं.

त्यावर फडणवीस तात्काळ म्हणाले की, ‘असंय की, मला सावधानतेने बोलावं लागतं कारण अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही काही तरी भलताच अर्थ काढायचे.’ असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ज्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पाहायला मिळाला.

देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत नेमकं काय?

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अमृतकाळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प मांडला. पाहा अर्थसंकल्पातील पंचामृत ध्येय कोणती?

ADVERTISEMENT

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित

ADVERTISEMENT

  1. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

  • महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

  • भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

  • रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

  • पर्यावरणपूरक विकास

  • Maharashtra Budget 2023 Live: तिजोरी उघडली! फडणवीसांकडून घोषणांचा पाऊस

    राज्य अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे:

    प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी तरतूद

    – कृषी विभाग : 3339 कोटी रुपये

    – मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये

    – सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये

    – फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये

    – अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये

    – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये

    – जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये

    – पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये

    – मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

    प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये

    Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट; शिंदे सरकाराचा निर्णय

    द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद

    – महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये

    – सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये

    – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये

    – इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये

    – दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये

    – आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये

    – अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये

    – गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये

    – कामगार विभाग : 156 कोटी रुपये

    द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपये

    तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास विभागांसाठी तरतूद

    – सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये

    – ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये

    – नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये

    – नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये

    – परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये

    – सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

    तृतीय अमृत एकूण : 53,058 कोटी रुपये

    विधान परिषदेत फटका बसताच शिक्षणसेवकांच्या मानधनात फडणवीसांकडून तब्बल १० हजारांची वाढ

    चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा विभागांसाठी तरतूद

    – उद्योग विभाग : 934 कोटी

    – वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी

    – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये

    – शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये

    – उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये

    – वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये

    – क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये

    – पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

    चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

    पंचम अमृत : पर्यावरणपूरक विकास विभागांसाठी तरतूद

    – वन विभाग : 2294 कोटी रुपये

    – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये

    – उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये

    पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये

    देवेंद्र फडणवीसांनी मांडला पंचामृत अर्थसंकल्प, नेमकं काय आहे पंचामृत ध्येय?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT