बलात्कारी, दरोडेखोरांना पकडणं सोडून नारायण राणेंच्या घरी नोटीस लावायला पोलिसांना वेळ आहे-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव

ADVERTISEMENT

बलात्कारी, दरोडेखोर यांना पकडण्यासाठी पोलिसांकडे वेळ नाही. त्या जिल्ह्यात जे काही सट्टा, जुगार सुरू आहे ते नियंत्रण करायला पोलिसांकडे वेळ नाही. मात्र नारायण राणेंच्या घरी नोटीस लावयाला वेळ आहे. काहीही झालं तरीही आम्ही नारायण राणेंच्या पाठिशी उभे आहोत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात केलं आहे. चाळीसगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नारायण राणेंना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

नारायण राणे पोलीस ठाण्यात हजर राहा! नितेश राणे प्रकरणात नोटीस

हे वाचलं का?

सिंधुदुर्गातल्या नितेश राणे प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरण यासंदर्भात नितेश राणेंना अटक करण्याची मागणी होते आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अधिवेशनातही हा मुद्दा समोर आला होता. तीन दिवस नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत हे कुणालाच माहित नाही.

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?-नारायण राणे

ADVERTISEMENT

नोटीसचं प्रकरण काय?

नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची माहिती मिळावा म्हणून कणकवली पोलीस नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. मात्र, त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलीस राणेंच्या कणकवली येतील निवासस्थानी आले. पोलिसांनी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर नोटीस लावली. दुपारी 3 वाजता ही नोटीस लावण्यात आली. ही नोटीस लागल्यानंतर मीडियाला याची वार्ता कळताच मीडियाने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अवघ्या दहा मिनिटातच राणेंच्या कर्मचाऱ्याने ही नोटीस काढून टाकली.

नारायण राणेंना सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT