उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत : कोश्यारींना हटविण्यावर फडणवीसांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची भूमिका जाहीर केली. येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे जाऊन आमची व्यथा मांडणार आहोत. तिथं आम्ही आमचा प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहोत, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

शिवाय, आपण या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचही उदयनराजे यांनी जाहीर केलं. तसंच राज्यपाल कोश्यारींवर कारवाई झाली नाही तर कमीत कमी शिवाजी महाराजांच तरी नावंही घेऊ नये असाही, आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. तसचं या सर्व प्रकरणामुळे आपण हतबल असल्याचंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान :

छत्रपती उदयनराजेंच्या याच भूमिकेवर आणि हतबलतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं. पुण्यात बोलताना फडणवीस म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. छत्रपतींचे वंशज कधीही हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे जरी ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचलेल्या देखील आहेत.

हे वाचलं का?

शेवटी राज्यपाल हे संवैधानिक पद असतं. त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींच्या हाती असतात. त्यामध्ये सरकार काहीही करु शकत नाहीत. महाराज ते देखील समजून घेतली. पण त्यांच्या भावनेच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहेत. शेवटी पुन्हा एकदा सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत कोण असूच शकत नाही. आमच्या सर्वांचे देखील तेच प्रेरणास्त्रोत आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

उदयनराजे काय म्हणाले?

उदयनराजे भोसले म्हणाले, “आज स्वार्थापोटी सर्व पक्ष, मग प्रादेशिक असो की राष्ट्रीय… सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा वा मूर्ती असते. त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करतो, असंच सर्वजण म्हणतात. मग अशा पार्श्वभूमीवर विकृत विधान, चित्रीकरण यातून महाराजांची अवहेलना केली जाते. त्यांच्याबद्दल गलिच्छ चित्र निर्माण केलं जातं, त्यावेळी राग कसा येत नाही. त्यांचं नाव घेता मग राग का येत नाही?”

ADVERTISEMENT

‘तुमचे पक्ष वेगवेगळे असतील, तुमचे अजेंडे वेगवेगळे असतील, पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता. मग हे विकृतीकरण थांबवत नसाल, तर छत्रपतींचं नाव का घेता. लहान मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोडका तोडका इतिहास त्यांच्यापर्यंत गेला, तर त्यांना तेच खरं वाटेल. आपण कधी या सगळ्याची दखल घेणार?’ त्यांच्यासमोर आपण कोणता इतिहास मांडणार आहोत? असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला.

ADVERTISEMENT

या लोकांना कधी कळणार आहे? पक्षाच्या प्रमुखांना. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवू नका. त्यांचं विमानतळाला कशाला द्यायचं? कशाला बेगडी प्रेम दाखवायचं. शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला साजरा करायचा. हे बोलताना सुद्धा वेदना होताहेत”, असं म्हणताना उदयनराजे भोसले यांचे डोळे भरून आले. दाटून आलेल्या कंठाने ते म्हणाले, ‘असे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो, तर परवडलं असतं. काय दिवस आले. हेच दिवस बघायचे होते. प्रत्येक ठिकाणी राजकारण करत राहिलो, तर भविष्य काय?”, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT