Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर कुणाची अडचण, कुणाला संधी, मंत्रिपद कुणाला?
Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्याचे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्र संतापला. अत्यंत निघृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली, छळ करण्यात आला. तसंच त्यांच्या मृतदेहासोबतही विटंबाणा केली गेली असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडेंचा राजीनामा, पंकजांची आक्रमक भूमिका

देेवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा?

अजित पवार यांच्यासमोरच्या अडचणी कशा वाढल्या?

छगन भुजबळ की प्रकाश सोळंके, संधी कुणाला मिळणार?
Dhananjay Munde Resigns : धनंजय मुंडे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा वादात सापडले आहेत. सध्या मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, त्यातल्या अनेकांनाही आपल्या निर्णयाबद्दल विचार करावा लागतोय. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांची या संपूर्ण प्रकरणावरची भूमिका सुद्धा विचार करायला लावणारी आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यायला सांगितला?
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याचं म्हटलं जातंय, मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ठोस भूमिका घ्यावी लागली. अशीही चर्चा आहे की, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर मुख्यमंत्री त्यांना बडतर्फ करून राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार होते असंही समोर आलंय.
धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित वादांची यादी मोठी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय गंभीर आहे. वाल्मिक कराडचा या प्रकरणात संबंध आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनामाच्या मागणी होत होती.
हे ही वाचा >> Kolhapur : पत्नीसोबतचा वाद टोकाला, पतीनं पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवून घेतलं, थरार कॅमेऱ्यात कैद
मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, फक्त राजीनामाच नाही तर, त्यांचं विधानसभा सदस्यत्वही रद्द करा, तसंच त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल करावा असंही ते म्हटले आहे.