Dhiraj Lingade : “नाना पटोले म्हणाले, अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर”
–जका खान, वाशिम Dhiraj Lingade alleges says BJP offered money to officers who on duty : पाच विधान परिषद निवडणुकीचे निकाल (MLC Election Results 2023) जाहीर झाले. सर्वात जास्त उत्सुकता ताणली गेली, ती अमरावती मतदारसंघात (amravati graduate constituency result). अवैध मतांची पुन्हा पडताळणी करून त्यांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे निकाल दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबला. अत्यंत चुरशीच्या […]
ADVERTISEMENT
–जका खान, वाशिम
ADVERTISEMENT
Dhiraj Lingade alleges says BJP offered money to officers who on duty : पाच विधान परिषद निवडणुकीचे निकाल (MLC Election Results 2023) जाहीर झाले. सर्वात जास्त उत्सुकता ताणली गेली, ती अमरावती मतदारसंघात (amravati graduate constituency result). अवैध मतांची पुन्हा पडताळणी करून त्यांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे निकाल दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत काँग्रेसचे (Congress) धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) विजयी झाले. या विजयानंतर लिंगाडे यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांचा स्वागत समारंभ बुलडाणा येथील काँग्रेस भवनात झाला. यावेळी बोलताना धीरज लिंगाडे यांनी भाजपने अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर दिली होती, असा दावा केलाय.
हे वाचलं का?
कार्यक्रमात बोलताना धीरज लिंगाडे म्हणाले, “आठ साडेआठ हजार जे अवैध मतदान होतं, ते मतदानाची पुन्हा पडताळणी करण्याची मागणी त्यांनी (भाजप) केली. मी होतो. आमचे सर्व सहकारी हॉलमध्ये होते. त्यांनी जेव्हा ही मागणी केली, मी काही बोललो नाही. मी ऐकत होतो. म्हटलं ठीक आहे.”
Satyajeet Tambe: मी जर प्रदेशाध्यक्ष असतो, तर…; तांबेंचं मोठं विधान
ADVERTISEMENT
नाना पटोले यांनी धीरज लिंगाडे यांना काय सांगितलं?
“त्यांनी (भाजप) पडताळणीची मागणी करताच अधिकारी तयार झाले. पहिली फेरी ही रिचेकिंगची होईल. मला नानाभाऊंचा (Nana Patole) फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, ‘धीरज, काहीही झालं तरी हॉलच्या बाहेर जायचं नाही आणि टेबल सोडायचे नाही. कारण त्या लोकांवर वरून प्रेशर आलेलं आहे आणि फार मोठ्या खोक्यांची ऑफर दिली आहे.”
ADVERTISEMENT
लीड कव्हर करू देण्यासाठी अधिकाऱ्यांना ऑफर? लिंगाडे काय म्हणाले?
पुढे बोलताना धीरज लिंगाडे म्हणाले, “आठ साडेआठ हजार मतांमधून माझा लीड कव्हर करून द्या असं सांगण्यात आलं होतं आणि म्हणून ती तपासणी सुरू करण्यात आली होती. त्या ठिकाणी आमचेही काही कर्मचारी होते. त्यांनी सांगितलं की, सगळेच्या सगळे टेबल लगेच सुरू करा. मी आक्षेप घेतला. मी म्हणालो की, तपासणी करायची असेल, तर चालेल पण ही तपासणी फक्त 10 टेबलवर होईल.”
सत्यजित तांबेंचा खळबळजनक गौप्यस्फोट! नाना पटोलेंचं प्रदेशाध्यपद धोक्यात?
‘त्यांची चेलेचपाटी चालवू दिली नाही’ -धीरज लिंगाडे
“तुमचे पाच जिल्हाधिकारी आहेत. पाच जिल्हाधिकाऱ्यांना दोन दोन टेबलची जबाबदारी द्या. दहाच टेबलवर करावी लागेल. ते त्यांनी मान्य केलं. आम्हीही दहा टेबल आमचे तीन-तीन कर्मचारी बसवले. तीन तास आम्ही त्यावर लक्ष घातलं. त्यातही जास्त मतं आपली झाली. त्यामध्येही त्यांची चेलेचपाटी चालू दिली नाही आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले”, असं धीरज लिंगाडे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT