व्हॅक्सिन घेतल्यानंतर झाला का मुंबईच्या मुलीच्या मृत्यू? काय आहे व्हायरल होणाऱ्या पोस्टमागचं सत्य?
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशात कोव्हिडसोबत लढण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे लस. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळणे या सगळ्या गोष्टी आहेतच. मात्र लस घेऊन स्वतःला सुरक्षित करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अशात मुंबईत सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. लस घेतल्यानंतर एका मुलीचा […]
ADVERTISEMENT
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशात कोव्हिडसोबत लढण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे लस. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळणे या सगळ्या गोष्टी आहेतच. मात्र लस घेऊन स्वतःला सुरक्षित करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अशात मुंबईत सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. लस घेतल्यानंतर एका मुलीचा मृत्यू झाला आहे. असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा
काय आहे फोटोतला मजकूर?
हे वाचलं का?
एका पंधरा वर्षांच्या मुलीच फोटो आहे त्यामध्ये तिला श्रद्धांजली देणारा मजकूर आहे. Death After Covid Vaccination असं टायटल या फोटोला देण्यात आलं आहे. 12 जानेवारीला हा मृत्यू झाल्याचा उल्लेख फोटोत करण्यात आला आहे. कुमारी आर्यबेन रूपेशभाई गोविंदजीभाई असं या मुलीचं नाव आहे. तिचं वय 15 वर्षांचं आहे असंही सांगण्यात आलं आहे. ती कच्छ या गावची आहे. सध्या मुंबईतील घाटकोपर मध्ये ती वास्तव्य करत होती. तिचा मृत्यू व्हॅक्सिन घेतल्यानंतर झाल्याचा दावा या फोटोमध्ये करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे मुंबईच्या महापौरांनी?
ADVERTISEMENT
याबाबत आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘घाटकोपरमध्ये एका मुलीचा मृत्यू लस घेतल्यानंतर झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. याबाबत मुंबई महापालिकेने या मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि माहिती घेतली. त्यानंतर हे समजलं आहे की या मुलीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे. तिला हा अटॅक व्हॅक्सिन घेतल्यामुळे आला का? हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समजू शकणार आहे. या मुलीचं कुटुंब पोस्टमॉर्टेम करायला तयार नाही मात्र आम्ही स्वतः मुलीच्या कुटुंबीयांना भेटणार आहोत कारण हे प्रकरण गंभीर आहे.
ज्या मुलीचा मृत्यू झाला आहे ती मुलगी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहात होती. 8 नोव्हेंबरला तिने राजावाडी रूग्णालयात लस घेतली होती. 11 जानेवारीला तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या निधनाबाबतचा फोटो आणि लस घेतल्याने निधन ही बाब सोशल मीडियावर ट्विटच्या आधारे व्हायरल झाली. त्यात हा दावा करण्यात आला आहे की मुलीचा मृत्यू व्हॅक्सिन घेतल्याने झाला.
बीएमसीने याबाबत काय म्हटलं आहे?
आर्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. तिला कार्डिअॅक अरेस्ट आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या दुःखातून सावरण्याचं धैर्य तिच्या कुटुंबीयांना मिळो. या मुलीच्या फोटोचा सोशल मीडियावर दुरूपयोग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT