दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह नितेश राणेंना दिलासा
अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणात नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, दिंडोशी सत्र न्यायालयाने पितापुत्रांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा […]
ADVERTISEMENT

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणात नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, दिंडोशी सत्र न्यायालयाने पितापुत्रांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन मृ्त्यू प्रकरणाबद्दल काही गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. तसेच सुशांतसिंह राजपूतला याची माहिती होती, त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप राणेंनी केलेला आहे. दिशा सालियन गर्भवती असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिशा सालियनच्या आईवडिलांचीही त्यांनी भेट घेतली होती.
अमित शाहांना फोन केल्याचं नारायण राणे धडधडीत खोटं बोलले; पोलिसांची न्यायालयात माहिती
दिशा सालियनच्या आईवडिलांनी राणेंनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आमच्या मुलीची बदनामी न करण्याचंही आवाहन केलं होतं. मात्र, त्यानंतर राणे यांनी पुन्हा आरोपांचा पुर्नउच्चार केल्यानंतर दिशा सालियनच्या आईवडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. महिला आयोगाने यासंदर्भात मालवणी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.










