ग्लोबल टीचर डिसलेगुरूजींना चूक मान्य, आरोपांबाबत मागितली जिल्हा प्रशासनाची माफी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या आरोपाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची माफी मागितली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजाविलेल्या कारणे दाखवा नोटिशीला चौकशीसाठी शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

डिसले गुरुजी जानेवारी महिन्यात रजेच्या परवानगी अर्जावरून चर्चेत आले होते. पीएच.डी.करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची परवानगी प्रलंबित ठेवली म्हणून डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर मानसिक त्रास व पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर केला होता.

ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले अडचणीत, जिल्हा परिषद कारवाई करण्याच्या तयारीत

हे वाचलं का?

रणजितसिंह डिसले यांच्या आरोपांची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी डिसले गुरुजींना नोटीस बजावली होती.मानसिक त्रास कोणी दिला आणि पैसे कोणी मागितले? याचा खुलासा करावा असे नोटिशीत नमूद करण्यात आले होते.या नोटीशीमुळे डिसले यांची अडचण वाढली होती.

अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या वर्ग शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती. दीड महिना शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवला,मानिसक त्रास दिला आणि पैशाची मागणी केली.असा त्यांनी केलेला आरोप आणि मागील तक्रारीवरून चौकशी समितीने सादर केलेला अहवाल या दोन्ही कारणांनी राज्यभर वादळ उठले होते. अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद प्रशासनाला तत्काळ परवानगी द्यायला लावली होती.रविवारी सुटी असतानाही प्रशासनाने त्रुटींची पूर्तता करून घेत त्यांना अटीसह परवानगी दिली होती.पण प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. प्रसारमाध्यमांसमोर डिसले गुरुजींनी केलेला आरोप प्रशासनाने गांभीर्याने घेतला.

ADVERTISEMENT

अभिमानास्पद! Global Teacher डिसले गुरूजींची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती

ADVERTISEMENT

सीईओ दिलीप स्वामी यांच्या नोटिसीला रणजितसिंह डिसले यांनी मंगळवारी उत्तर दिले आहे.एक पानी उत्तरात त्यांनी अनवधानाने प्रशासनावर आरोप केला. मला माफ करावे.’आता यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही,’अशी भूमिका मांडली आहे.पाच ते दहा ओळींत त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे,असे सीईओ स्वामी यांनी सांगितले. डिसले यांनी नोटिशीला दिलेले हे उत्तर पुढील चौकशीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. शिक्षण अधिकारी डॉ.किरण लोहार हे या पत्रातील उत्तराबाबत खातरजमा करतील आणि अहवाल सादर करतील.त्या अहवालावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT