संघातून काढून टाकायची धमकी देत खेळाडूवर बलात्कार, कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोल्यात एका कबड्डी प्रशिक्षकाला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संघातून काढून टाकण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार आणि आणखी एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

अतिरीक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी.पिंपळकर यांनी आरोपी प्रशिक्षकाला जन्मठेपेसह ३ लाख १० हजारांचा दंडही ठोठावला आहे.

शुद्धोधन सहदेव अंभोरे असं या आरोपी कबड्डी प्रशिक्षकाचं नाव आहे. शिवणी येथील एका भागात तो एका शाळेत मुलींना कबड्डीचं प्रशिक्षण द्यायचा. यावेळी संघातील एका मुलीला टीममधून बाहेर काढायची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. २०१८ च्या दरम्यान ही पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर ही बाब समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

मुलगा होत नसल्यामुळे पत्नीवर रॉकेल टाकून पेटवलं, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा

पोलिसांनी या घटनेचा तपास करुन आरोपी प्रशिक्षकाला अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालवत असताना सरकारी वकीलांनी मांडलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रशिक्षक शुद्धोधनला जन्मठेप सुनावली आहे. तसेच कबड्डी प्रशिक्षणादरम्यान आरोपी शुद्धोधनने आणखी एका तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रारही समोर आली होती. ज्यात न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांचा कारावास सुनावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT