संभाजी भिडे भेटले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना; टिपू सुलतान जयंतीवरून दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे सातत्यानं वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत आहेत. आता भिडेंनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतलीये. त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि निवदेनही दिलंय.

ADVERTISEMENT

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले. महिला पत्रकाराला तू टिकली लावून ये नंतर तुझ्याशी बोलतो, असं म्हटल्यानं संभाजी भिडे टीकेचे धनी ठरताहेत. त्याच्या या विधानावरून राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता संभाजी भिडेंनी टिपू सुलतान जयंतीला विरोध केलाय.

झालं असं की, संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत शुक्रवारी (४ नोव्हेंबर) बाईक रॅली काढण्यात येणार होती. मात्र, या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली.

हे वाचलं का?

टिकली लाव मग बोलेन! संभाजी भिडे महिला पत्रकाराला असं का म्हणाले?

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संभाजी भिडे मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोटरसायकलवरून गेले. संभाजी भिडे यांनी सिग्नल तोडत मोटरसायकलवरुन पुढे गेले. त्यानंतर संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी जात असताना संभाजी भिडे यांनी पत्रकारांना मज्जाव केला होता. तसंच या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ADVERTISEMENT

संभाजी भिडे यांनी आजवर केलेली वादग्रस्त वक्तव्य!

टिपू सुलतान जयंतीला संभाजी भिडे यांचा विरोध

संभाजी भिडे यांनी टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास परवानगी देऊ अशी मागणी प्रशासनाकडे केलीये. यासंदर्भात संभाजी भिडे यांनी जिल्हा प्रशासनाला १३ नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. टिपू सुलतानची जयंती कोणत्याही परिस्थितीत साजरी केली जाऊ नये, असं निवेदन संभाजी भिडे यांच्याकडून देण्यात आलं आहे.

Amruta Fadnavis : “भिडे गुरूजींबाबत मला आदर, मात्र महिलांनी कसं जगावं हे कुणीही सांगू नये”

पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने टिपू सुलनाची जयंती साजरी करणाऱ्यांना परवानगी देऊ नये. जर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली नाही, तर सांगली जिल्ह्यात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाणार नाही, असा इशाही संभाजी भिडे यांनी दिला आहे. दरम्यान, मागण्या आणि निवेदनाबाबत संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलणं त्यांनी टाळलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT