तुमच्या मोबाइलवरही सेक्स नोटिफिकेशन येतात?, त्यामागचं कारण काय आहे माहितीये का?
स्मार्टफोन आणि इंटरनेटचं जग वाटतं तितकं सोपं नाही. येथे प्रत्येक क्षणी यूजर्सचं निरीक्षण केलं जातं. प्रत्येक वेळी तुमची हेरगिरी करणे हा या निगराणीचा उद्देश नसला तरी त्यापेक्षा कमी नसतो. अनेक लोक तक्रार करतात की त्यांना फोनमध्ये प्रौढ जाहिराती किंवा सेक्सुअल कन्टेन्टचे नोटिफिकेशन मिळतात. Google किंवा इतर अॅप्स तुम्हाल मुद्दामहून अशे नोटीफिकेशन पाठवतात का ? असं […]
ADVERTISEMENT
स्मार्टफोन आणि इंटरनेटचं जग वाटतं तितकं सोपं नाही. येथे प्रत्येक क्षणी यूजर्सचं निरीक्षण केलं जातं. प्रत्येक वेळी तुमची हेरगिरी करणे हा या निगराणीचा उद्देश नसला तरी त्यापेक्षा कमी नसतो. अनेक लोक तक्रार करतात की त्यांना फोनमध्ये प्रौढ जाहिराती किंवा सेक्सुअल कन्टेन्टचे नोटिफिकेशन मिळतात.
ADVERTISEMENT
Google किंवा इतर अॅप्स तुम्हाल मुद्दामहून अशे नोटीफिकेशन पाठवतात का ? असं अजिबात नाही. वास्तविक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Google आणि इतर अॅप्स तुम्हाला वापरकर्त्याच्या वर्तनानुसार जाहिराती दाखवतात. म्हणजेच तुम्ही तुमच्या वापरातून असे कन्टेन्ट पहिले असणार.
sex ऍड्स का दिसतात?
Google किंवा Facebook सारख्या इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहता त्या जाहिराती अल्गोरिदम फॉलो करतात. हे अल्गोरिदम वापरकर्त्याची निवड, मीडिया वापर आणि लाईक आणि कमेंट्सवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, तुम्ही अनावधानाने किंवा स्वेच्छेने अशी कोणतीही वेबसाइट किंवा कन्टेन्ट पहिला असेल, जो प्रौढ श्रेणीतील असेल. यानंतर तुमचे वर्तन मशीनच्या अल्गोरिदममध्ये अपडेट होते आणि तुम्हाला अशा जाहिराती दिसू लागतात.
हे वाचलं का?
WhatsApp चं नवं फीचर, कुणालाही घेता येणार नाही स्क्रीनशॉट!
इंस्टाग्राम रील्स ते यूट्यूब अशा प्रकारे काम करतात
हे अल्गोरिदम केवळ तुम्ही पाहता त्या जाहिरातींसाठीच नाही तर तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या कन्टेन्टसाठी देखील कार्य करते. काही लोक तक्रार करतात की, त्यांना एकसारखेच रील्स किंवा पोस्ट पाहायला मिळतात. याचे कारण स्पष्ट आहे. तुम्ही तसं सर्च केलं असणार किंवा त्या कंटेंटला लाईक केलं असणार. ज्या काही गोष्टी तुम्ही पाहतात, त्यामध्ये काहीतरी नक्कीच असं असेल जे तुम्हाला आवडलं असणार.
ADVERTISEMENT
नोटिफिकेशन कसे बंद करायचे?
तुमच्याकडे येणाऱ्या नोटिफिकेशन्सचे प्रकरण थोडे वेगळे आहे. काही नोटिफिकेशन Google किंवा Chrome वरून येतात. या नोटिफिकेशन तुमच्या शोध पद्धतीवर आधारित असतात, तर काही सूचना तुम्हाला वेबसाइटवरून पाठवल्या जातात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला adult नोटिफिकेशन मिळत असतील, तर तुम्ही अशा वेबसाइटला भेट दिली असेल आणि त्यांच्या सूचनांचे सदस्यत्व घेतले असेल. असे अनेक लोकांसोबत घडते. नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते सहज बंद करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT