रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा
सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईत हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेलं आव्हान. त्यानंतर झालेला संघर्ष आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक. या दोघांमुळे सध्या हनुमान चालीसा प्रकरण गाजतं आहे. अशात चर्चेत असणाऱ्या राणा दाम्पत्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोघांचं लग्न कसं जमलं […]
ADVERTISEMENT
सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईत हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेलं आव्हान. त्यानंतर झालेला संघर्ष आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक. या दोघांमुळे सध्या हनुमान चालीसा प्रकरण गाजतं आहे. अशात चर्चेत असणाऱ्या राणा दाम्पत्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोघांचं लग्न कसं जमलं त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? हे आपण जाणून घेऊ.
रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ ते २०११ च्या दरम्यान मुंबईत झाली. रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांनी सांगितलं की २००९ मध्ये पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले. रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबीरातून झाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. रामदेवबाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न साधेपणाने करायचं असा निर्णय रवी राणा यांनी घेतल्याचं त्यांच्या भावाने म्हणजेच सुनील राणा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सुनील यांनी आज तकला सांगितलं की रवी राणा आणि नवनीत या दोघांचं लग्न अमरावतीत सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं आहे. त्यावेळी ठरवलं असतं तर रवी राणा हे थाटामाटात लग्न करू शकले असते. मात्र या दोघांनी साधेपणाने लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. एवढंच नाही तर रवी राणा आणि नवनीत यांनी लग्नाला येणारी खर्चाची रक्कम ही गरीबांमध्ये दान केली. राणा कुटुंब दर वर्षी साधारण एक लाख गरीब कुटुंबाना दिवाळीच्या उत्सवात धान्य वाटप करतात.
ADVERTISEMENT
राजकारणात आल्यानंतर बडनेरा हेच विधानसभा क्षेत्र रवी राणा यांनी निवडलं कारण या ठिकाणी अनेक मतदार गरीब आणि स्लम भागात राहणार होते. गरीबांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी हा मतदार संघ निवडला असंही सुनील राणा यांनी सांगितलं. २००९ विधानसभा निवडणूक पहिल्यांदा रवी राणा यांनी लढवली आणि ते जिंकले. त्यानंतर सलग तीनवेळा त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे.
रवी राणा यांचा अमरावतीत फ्लोटिंग आणि इमारत उभारणीचा व्यवसाय आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून रवी राणा यांनी घरातली जबाबदारीही सांभाळली आहे. सुरूवातीला रवी राणा हे शाळेत दहावीच्या मुलांना परीक्षेच्या दरम्यान पाणी पुरवण्याचंही काम करत होते. समाजसेवेची सुरूवात ही तेव्हापासूनच झाली होती. पुढे मोठं झाल्यानंतर रवी राणा यांनी कॉलेज शिक्षण घेत असताना एका शॉपमध्ये सेल्स एक्झ्युकिटिव्ह म्हणूनही काम केलं.
नवनीत यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९८६ ला महाराष्ट्राची राजधानी मुंबईत झाला. नवनीत यांचे आई वडील हे मूळचे पंजाबचे आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. नवनीत कौर यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी छंद म्हणून मॉडेलिंग सुरू केलं. एक चांगल्या मॉडेल म्हणून काम करत असतानाच त्या अभिनेत्री झाल्या. मॉडेलिंग करत असताना त्यांनी म्युझिक अल्बममध्येही काम केलं. त्यानंतर दर्शन नावाच्या एका कन्नड सिनेमात काम केलं.
त्यानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी पाऊल ठेवलं. २००९ ते २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात रवी राणा आले. रामदेवबाबांच्या शिबिरात त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांचं प्रेम जमलं आणि नंतर या दोघांनीही लग्न केलं. अमरावती येथील ४ हजार १२० लोकांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात या दोघांनी लग्न केलं. त्यावेळी त्यांच्या लग्नाची चर्चा देशभरात झाली होती.
रवी राणा यांच्या लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील पतीसह राजकारणात सक्रिय झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेना खासदार आनंदराव यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर त्या शिवसेनेच्या विरोधात झाल्या. आपला पराभव विजयात परावर्तित करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडक लढवली. तसंच आनंदराव अडसुळ यांना हरवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
ADVERTISEMENT