मित्रानेच घेतला जीव, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; डोबिंवलीतील ‘त्या’ खुनाचं गुढ उलगडलं
रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोशा बुक्क्यांनी तसंच चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या केली तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली होती. घटनेचं गुढ २४ तासांत उलगडलं आहे. ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात बेचनप्रसाद चौहान या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर बबलू चौहान […]
ADVERTISEMENT

रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोशा बुक्क्यांनी तसंच चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या केली तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली होती. घटनेचं गुढ २४ तासांत उलगडलं आहे.
ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात बेचनप्रसाद चौहान या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर बबलू चौहान याला जखमी करण्यात आलं होतं. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर ही हत्या चोरीच्या उद्देशानं केली गेली नसल्याचं स्पष्ट झालं.
डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचन आणि बबलू चौहान हे भाड्याने राहत होते. उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल (५ ऑक्टोबर) रात्री दीडच्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून ते दोघे जाणार होते. त्यासाठी रिक्षाने ते शेलारनाका येथून साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली येथील समांतर रोडने जात होते.
त्याचवेळी अनोळखी इसमानी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास पळवुन लावले. त्यानंतर बेचन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला. मात्र बेचन हा त्यांच्या तावडीत सापडला.