Missed Periods : असुरक्षित संबंधांमुळेच नव्हे, तर ‘या’मुळेही चुकते मासिक पाळी!
मासिक पाळी चुकण्याची अनेक कारणे आहेत. जसे लाईफ स्टाईल बदलणे, आजारपण आणि गोळ्या. तसेच जर तुम्ही गर्भवती नसाल तर जास्त वजन, हार्मोन्सचे असंतुलन आणि मेनोपॉज ही मासिक पाळी चुकण्याची कारणे आहेत.
ADVERTISEMENT
Missed Periods Reasons : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून यशाची उंची गाठतायत. या धकाधकीत त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यात सर्वांत महत्वाची समस्या म्हणजे मासिक पाळी. अनेक महिलांचे पीरीयड मिस (missed periods) होतोयत. त्यात तुम्ही जर अविवाहीत आहात आणि तुम्ही गर्भधारणेसाठी तयारी देखील नसलात, अशा अवस्थेत मासिक पाळी चुकणे एखाद्या वाईट स्वप्नासारखे आहे. कोणत्याही महिलेला असा अनुभव करायचा नाही. मासिक पाळी चुकण्याची अनेक कारणे आहेत. जसे लाईफ स्टाईल बदलणे, आजारपण आणि गोळ्या. तसेच जर तुम्ही गर्भवती नसाल तर जास्त वजन, हार्मोन्सचे असंतुलन आणि मेनोपॉज ही मासिक पाळी चुकण्याची कारणे आहेत. (due to these reason your periods may be late or missed know the reasons)
ADVERTISEMENT
लेट पीरियड कसे ओळखाल?
जर तुमची मासिक पाळी (missed periods) 28 दिवसांची आहे आणि जर 29 किंवा 30 दिवसानंतर देखील तुम्हाला मासिक पाळी आली नाही, तर तुमचे पीरियड लेट आहेत. असे अनेकदा महिलांसोबत होत असते.जर तुम्हाला 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले असेल तर त्याला पीरियड मिस झाल्याचे म्हणता येईल. जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.
जास्त पाणी पिणं ठरु शकतं आरोग्याला धोकादायक; किती असावं दिवसाचं प्रमाण?
तणाव
सध्याच्या महिला-तरूणी पुरुषांप्रमाणेच 9 टू 5 जॉब करत असतात. यामध्ये प्रवास आणि ऑफिसच काम यामुळे त्या अनेकदा तणावात येतात. अधिकचा तणाव तुमच्या शरीरात गोनाडोट्रोपिन रिलिझिंग हार्मोन (GnRH)च्या उत्पादनात व्यत्यय आणतात. हे हार्मोन तुमचे ओव्हुलेशन आणि मासिक पाळी नियंत्रित (missed periods) करण्याचे काम करते. मासिक पाळीस उशीर होणे यास शारीरीक आणि मानसिक तणाव कारणीभूत असतो. जर तुम्ही खुप जास्त वेळेपासून तणावात आहात आणि मासिक पाळी आलीच नसेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्या तणावातून बाहेर आलात तर तुमची पिरियड सायकल व्यवस्थित होऊ शकते.
हे वाचलं का?
हाई इंटेसिटी वर्कआऊट
हाई इंटेसिटी वर्कआऊट तुमचे मासिक पाळी चुकण्याचे कारण ठरू शकते. रोज एक किंवा दोन तास वर्कआऊट केल्याने तुमचे पिरियड मिस(missed periods)होत नाहीत. मात्र त्यापेक्षा जास्त तास व्यायाम केल्यास त्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो. जर तुम्हाला जास्त वेळ व्यायाम करायचा असेल तर स्पोर्टस मेडिसिन हेल्थकेअर एक्सपर्टचा सल्ला घ्या. त्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे फायद्याचे ठरवले आहे.
Fruits Storage :फळे लवकर खराब होतात? फ्रीजशिवाय ताजे ठेवण्याची ही घरगुती पद्धत घ्या जाणून..
लाईफस्टाईलमध्ये बदल
जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल झाला, तर त्याचा परीणाम मासिक पाळीवर होऊ शकतो. अनेक दिवस तुम्ही नाईट शिफ्ट करतात.त्यानंतर पुन्हा शिफ्टमध्ये बदल होतो. यामुळे तुमचे पीरियड कधी लवकर तर कधी उशिरानेही येऊ शकतात.
ADVERTISEMENT
औषधांचा प्रभाव
अॅटीडिप्रेसेंट, अॅटीसाइकोटीक्स, थायरॉईडची औषधे, अॅटीकॉनवल्सेंट आणि काही किमोथेरेपीची औषधे मासिक पाळीवर परीणाम करू शकतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या मासिक पाळीत अडथळा निर्माण करू शकतात.
ADVERTISEMENT
वजन वाढणे
अनेकदा वाढत्या आणि घटत्या वजनाचा मासिक पाळीवर परिणाम होतो. वजन वाढण्याचा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्सवर परीणाम होतो. त्यामुळे प्रजनन क्षमतेवरही परीणाम होतो. जास्त वजन असणे हे पिरियड मिस होण्याचे कारण आहे. तसेच गंभीर स्वरूपात वजन कमी होणे हे देखी मासिक पाळीची सायकल बिघडवू शकतात.
मेनोपॉज
मेनोपॉज म्हणजे रजोनिवृ्त्ती अशा अवस्थेत महिलांमध्ये मासिक पाळी संपुष्टात येते. यापुर्वी तुम्हाला खुप कमी अनेकदा पिरीयडस येत असतात. ही समस्या त्यावेळेस वाढते ज्यावेळेस महिला प्रीमेनोपॉज मधून जात असतात.त्यामुळे महिलांना अनेकदा वाटतं त्या प्रेग्नेंट तर नाही, यामुळे त्या अनेकदा मानसिक तणावातही जातात. अशा अवस्थेत मासिक पाळी (missed periods) चुकल्यावर महिलांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT