‘नेहरू आडनाव का लावत नाही?’, Rahul Gandhi यांना पुन्हा कोणी डिवचलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Anurag Thakur on Rahul Gandhi: डोंबिवली: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) हे भाजप (BJP) पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघात आले होते. पक्षवाढीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांची सभा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची डोंबिवली पूर्व येथील रोटरी गार्डनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेस (Congress) पक्षाचा चांगलाच समाचार घेतला.

ADVERTISEMENT

मोदीजींनी कोणाचाही अपमान केलेला नाही त्यांनी एक साधा सरळ प्रश्न गांधी घराण्याला विचारला आहे. काँग्रेसचा हा परिवार नेहरूजींचे (Neharu) आडनाव वापरायला का घाबरतो? असा काय नाईलाज आहे की ते नेहरूंचे आडनाव लावत नाहीत. यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जर अपमान वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी डोंबिवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

Rahul Gandhi : नोटीस आली, खासदारकीवर टांगती तलवार; राहुल गांधी म्हणाले…

हे वाचलं का?

‘आयकर विभागाला जिथे संशय येतो तिथे…’

यावेळी त्यांना बीबीसीवर झालेल्या इन्कम टॅक्स कारवाई संदर्भात विचारले आसता माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ज्या ठिकाणी गैरव्यवहार असल्याचा संशय इन्कम टॅक्स विभागाला येतो त्या ठिकाणी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई होते असे सांगितले. त्यानंतर त्या संस्थेने केलेल्या व्यवहाराचा पूर्ण अभ्यास करून आणि सर्वे करून इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती प्रसारित केली जाते. ज्यावेळी त्यांची चौकशी पूर्ण होईल त्यावेळी रिपोर्ट देण्यात येईल. भारतात जी न्यायव्यवस्था आहे त्याच्यावर कोणीही नसेल असे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले.

ADVERTISEMENT

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्ती जास्त जागा निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून यावेळी मोदींना आत्तापेक्षा अधिक जागा घेऊन निवडून आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

Bharat Jodo : राहुल गांधी दाढी का करत नाहीयेत?

‘लोकसभेच्या आत्तापेक्षा अधिक जागा निवडून आणणार’

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्ती जास्त जागा निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून यावेळी मोदींना आत्तापेक्षा अधिक जागा घेऊन निवडून आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एप्रिल 2024 ला लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी माझ्याकडे , पालघर, कल्याण डोंबिवली, साऊथ मुंबई, साऊथ सेंट्रल मुंबई या लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली असून ती जबाबदारी पार पाडण्यासाठी वर्षभरात माझे अनेक दौरे होत राहतील अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे कामाची गती मंदावली होती. आता पुन्हा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT