मंत्री तानाजी सावंतांनी भर कार्यक्रमात असं का केलं? सर्वत्र चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Minister tanaji sawant and MP omraje nimbalkar : शिवसेनेत फूट पडल्यापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health minister Tanaji Sawant) हे नेहमी उस्मानाबादचे (Osmanabad Mp Omraje Nimbalakar) खासदार ओमराजे निंबाळकर आणि (MLA kailas patil) आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी भलतंच चित्र पाहायला मिळालं. ती म्हणजे नेहमी टीका करणाऱ्या सावंतांनी एका कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत घोषणा दिल्या. त्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळपासून भलत्याच चर्चाना वेग आले आहे. तिघांमधील कटुता संपली का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. Minister tanaji sawant, mp omraje nimbalkar and mla kailas patil meet today

ADVERTISEMENT

Tanaji Sawant: ‘Aaditya ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये..’, सावंतांची बोचरी टीका

नेमकं काय घडलं?

उस्मानाबाद शहरातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासह भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर तेथे आले. दोघे येताच सावंतांनी दोघांना जवळ बोलावलं. दोघांच्या खांद्यावर हात टाकला. शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील दिल्या.

हे वाचलं का?

राजकारणात काहीही होऊ शकतं

इतकंच नाही तर जवळ बोलावून दोघांचे हात देखील उंचावले. हे पाहून उपस्थित नागरिक देखील अचंब्यात पडले. विविध तर्कवितर्क लावायला सुरु झाले. बंडखोरी झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंकडे राहिले. तर तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौघुले यांनी बंडखोरी करत, शिंदेंना पाठिंबा दिला. तेंव्हापासून या दोन्ही गटात दुरावा आणि अबोला पाहायला मिळत होता. मात्र आजच्या घटनेनंतर राजकारणात काहीही होऊ शकतं, हे खरं ठरलं आहे.

अनेकदा तानाजी सावंतांनी आमदार-खासदारावर केले होते आरोप

अनेकदा तानाजी सावंतांनी आमदार-खासदारावर तोंडसुख घेतलं आहे. हफ्ते घेण्यापासून ते ब्लॅकमेलिंगपर्यंत आरोप त्यांनी दोघांवर लावले. मात्र मागच्या काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण बदलताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी डीपीडीसीच्या निधीत असमतोल असल्याची तक्रार मंत्रालयात केली होती. पाटलांचा रोख थेट मंत्री सावंत यांच्याकडे होता. कारण डीपीडीसीचा 100 टक्के निधी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात प्रस्तावित केला होता. म्हणून दोघांमध्ये दरी पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणारे तानाजी सावंत कोण आहेत? त्यांना इतका राग का येतो?

ADVERTISEMENT

राणा पाटलांना शह देण्यासाठी सावंतांनी असं केलं का?

आमदार राणा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. अशात राणा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे विरोधक ओमराजे निंबाळकर यांना जवळ करण्याचं कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राणा पाटलांना शह देण्यासाठी सावंतांनी हे केलं का? असा देखील सवाल यादरम्यान उपस्थित होत आहे. आता यावर आमदार कैलास पाटील आणि खासदार निंबाळकर काय उत्तर देतात, याकडे देखील लक्ष राहणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT