आता ईडीचा मोर्चा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसकडे; या प्रकरणात केलं आरोपी
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे बुधवारी आर्थिक तपास एजन्सी (ईडी) ने सुकेश चंद्रशेखर याच्या 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी म्हणून नाव समावेश करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलीनला होती आणि ती खंडणीतून मिळणाऱ्या रकमेची लाभार्थी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईडीने केली चार्जशीट दाखल ईडीने […]
ADVERTISEMENT
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचे बुधवारी आर्थिक तपास एजन्सी (ईडी) ने सुकेश चंद्रशेखर याच्या 215 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी म्हणून नाव समावेश करण्यात आलं. सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलीनला होती आणि ती खंडणीतून मिळणाऱ्या रकमेची लाभार्थी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
ईडीने केली चार्जशीट दाखल
ईडीने आज जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. वसुलीच्या पैशाचा फायदा जॅकलिनलाही झाला असून सुकेश हा गुन्हेगार असल्याचे तिला माहीत होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरले आहे.
हे वाचलं का?
या कारणावरून ईडीने जॅकलिनवर आरोप केले
सुकेश हा गुन्हेगार असून तो तिहार तुरुंगात आहे, हे जॅकलिनला माहीत होते. पण तरीही तिने भेटवस्तू घेतल्या.
ADVERTISEMENT
जॅकलीनला माहित होते की ती ज्या मौल्यवान भेटवस्तू करोडोंमध्ये घेत आहे त्या फसवणुकीच्या पैशाने खरेदी केल्या गेल्या आहेत.
ADVERTISEMENT
अनेक प्रमुख साक्षीदार आणि आरोपींच्या जबानीवरून असे समोर आले आहे की, जॅकलीन व्हिडिओ कॉलद्वारे सुकेशच्या सतत संपर्कात होती.
सुकेशने जॅकलिनला महागडे गिफ्ट दिल्याची कबुली दिली आहे.सुकेश हा गुन्हेगार असून तो तिहार तुरुंगात आहे, हे जॅकलिनला माहीत होते. पण तरीही तिने भेटवस्तू घेतल्या.
जॅकलीनला माहित होते की ती ज्या मौल्यवान भेटवस्तू करोडोंमध्ये घेत आहे त्या फसवणुकीच्या पैशाने खरेदी केल्या गेल्या आहेत.
अनेक प्रमुख साक्षीदार आणि आरोपींच्या जबानीवरून असे समोर आले आहे की, जॅकलीन व्हिडिओ कॉलद्वारे सुकेशच्या सतत संपर्कात होती.
सुकेशने जॅकलिनला महागडे गिफ्ट दिल्याची कबुली दिली आहे.
सुकेशने जॅकलिनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्या मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलीनला 10 कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्या. ईडीने अभिनेत्रीची 7 कोटींहून अधिकची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांचाही समावेश होता.
सुकेशने तुरुंगात असताना एका महिलेची २१५ कोटी रुपयांची फसवणूक केली
दिल्लीच्या तुरुंगात असताना सुकेशने एका महिलेची २१५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर सुकेशने याच खंडणीच्या पैशातून जॅकलिनला करोडोंच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. भेटवस्तूंमध्ये हिरे, दागिने, 52 लाखांचा घोडा आणि इतर अनेक महागड्या भेटवस्तूंचा समावेश होता. सुकेशने लोकांना फसवून हे सर्व पैसे कमावल्याचे सांगण्यात आले.
जॅकलिन आणि सुकेशमध्ये होते प्रेमसंबंध?
सुकेशने जॅकलिनला एवढ्या मौल्यवान भेटवस्तू का दिल्या? हा प्रश्न अनेकांना पडला होता. यानंतर जॅकलिन आणि सुकेश एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असल्याचे समोर आले. काही काळापूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे काही इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.ज्यानंतर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते.
जॅकलिनच्या आगामी बिग बजेट चित्रपटांचं काय?
ईडीच्या कारवाईनंतर एकीकडे जॅकलीन फर्नांडिस वाईटरित्या अडकताना दिसत आहे. तर दुसरीकडे तिच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग सुरु आहे. यामध्ये तिचे दोन चित्रपट बिग बजेटचे आहेत. राम सेतूमध्ये जॅकलिन अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. जॅकलिनच्या या चित्रपटाचे बजेट 80 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जॅकलीन रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत रणवीर सिंग आणि पूजा हेगडे स्क्रिन शेअर करणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT