PMLA Court: संजय राऊत प्रकरणात ईडीने भीतीचं वातावरण कसं निर्माण केलं? शरद पवारांचं नाव घेत न्यायालयाने काय म्हटलं?
संजय राऊत प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं गेलं नाही? असा प्रश्न विचारत PMLA न्यायालयाने ईडी या तपासयंत्रणेनं भीतीचं वातावरण निर्माण केलं ही बाब नमूद केली आहे. PMLA अर्थात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट विशेष न्यायालयाने म्हटलं आहे ईडीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मनात भीती […]
ADVERTISEMENT

संजय राऊत प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं गेलं नाही? असा प्रश्न विचारत PMLA न्यायालयाने ईडी या तपासयंत्रणेनं भीतीचं वातावरण निर्माण केलं ही बाब नमूद केली आहे. PMLA अर्थात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग अॅक्ट विशेष न्यायालयाने म्हटलं आहे ईडीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ईडीने भीती कशी निर्माण केली गेली?
ईडी या तपास यंत्रणेने अनेक अधिकाऱ्यांना अटक करणं किंवा आरोपी बनवणं, संभाव्य आरोपींना साक्षीदार बनवणं यातून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना त्यांना असा संदेश द्यायचा होता की आता यापुढे तुमचा नंबर लागू शकतो.
ईडीच्या आरोप पत्रात शरद पवारांचं नाव
पत्रा चाळ प्रकरणात ईडीने दाखल केलेलं जे आरोपपत्र आहे त्यात २००६-०७ या वर्षात संजय राऊत यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या बैठकीत भाग घेतल्याचा उल्लेख आहे. तसंच त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या काळात देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांचंही नाव यात आहे. भाजपने हाच मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीचीही मागणी केली होती.
स्वप्ना पाटकर यांच्याबाबत काय म्हटलं आहे कोर्टाने?
संजय राऊत यांच्या विरोधातल्या खटल्यात त्यांच्या माजी सहकारी स्वप्ना पाटकर मुख्य साक्षीदार होत्या. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यात भांडण आणि वाद झाल्यानंतर त्या साक्षीदार झाल्या होत्या. खासदाराने प्रोसीड ऑफ क्राईम अर्थात पीओसी रोख रक्कम कशी दिली ते स्वप्ना पाटकर यांनी सांगितलं होतं. कोर्टाने याबाबत प्रश्न विचारला की ईडीने स्वप्ना पाटकर यांना आरोपी का केलं नाही? त्यांना अटकही का झाली नाही? तक्रारीत हे स्पष्ट होतं आहे की त्यांनी सदरचा व्यवहार केला होता.
न्यायालयाने पुढे हे नमूद केलं की ईडीने जोरदार युक्तिवाद केला की ज्याने पीओसी हाताळले आहे त्याला आरोपी बनवले जाऊ शकते. यासह, न्यायालयाने म्हटले आहे की, जर हेच नियम स्वप्ना पाटकरांच्या बाबतीत लागू केले गेले तर त्यांनी कथित पीओसी प्राप्त केली आहे आणि संजय राऊतच्या सांगण्यावरून स्वत:साठी आणि तिच्या पतीसाठी जमीन/प्लॉट खरेदी केला आहे, स्वप्ना पाटकर या कलम 3 अंतर्गत तितक्याच जबाबदार आहेत.
PMLA कायद्याच्या कलम तीन नुसार जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होण्याचा प्रयत्न करतो किंवा जाणूनबुजून मदत करतो किंवा जाणूनबुजून एक पक्ष असतो किंवा प्रत्यक्षात गुन्ह्याच्या कमाईशी संबंधित कोणत्याही प्रक्रियेत किंवा क्रियाकलापात गुंतलेला असतो आणि त्याला अप्रतिम मालमत्ता म्हणून प्रक्षेपित करतो तो मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यासाठी दोषी असेल.