Land Deal case : ईडीकडून एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी आणि जावयाविरोधात Charge sheet
The Enforcement Directorate अर्थात ईडीने पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री आणि आत्ताचे राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse , त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात चार्जशीट फाईल केली आहे. 2017 चं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे. युतीचं सरकार असताना एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळी पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या जमीन […]
ADVERTISEMENT
The Enforcement Directorate अर्थात ईडीने पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री आणि आत्ताचे राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse , त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात चार्जशीट फाईल केली आहे. 2017 चं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे. युतीचं सरकार असताना एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळी पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद सोडावं लागतं.
ADVERTISEMENT
27 ऑगस्टला ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात 5 कोटी 73 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये लोणावळ्यातील एक बंगला, जळगावमधले तीन जमिनींचे प्लॉट आणि तीन फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत.
ही जप्ती पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी करण्यात आली असल्याचं ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याच प्रकरणात मनी लाँडरिंगबाबत देखील चौकशी सुरु आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मागील महिन्यातच अटक करण्यात आलं होतं. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर खडसे यांची दोन वेळा ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. याच वेळेस खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना आतापर्यंत ईडीने अनेकदा समन्स बजावलं आहे. मात्र, आतापर्यंत त्या एकदाही ईडीसमोर हजर झालेल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्येक समन्सला प्रकृती स्वास्थ्याचं कारण दिलं आहे.
Eknath Khadse: ED ची मोठी कारवाई, लोणावळ्यातील बंगल्यासह खडसेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त
ADVERTISEMENT
पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरण नेमकं आहे तरी काय?
ADVERTISEMENT
2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.
या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती.
एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली.
दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT