वक्फ बोर्डाच्या पुणे आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर ईडीचे छापे, नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण सात ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
ADVERTISEMENT
वक्फ बोर्ड हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
Maharashtra | Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
— ANI (@ANI) November 11, 2021
ईडीची ही कारवाई नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहचणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. नवाब मलिक यांनी गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय यंत्रणांचा वापर हा महाराष्ट्रातलं सरकार बदनाम करण्यासाठी कसा केला जातो आहे हे सांगितलं होतं. भाजपवरही त्यांनी आरोप केले होते. आत्ता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आहेत की नाही हे सांगता येणार नाही. पण ईडीने जमिनीच्या सौद्यांवरून जे छापे मारले आहेत त्यावरून नवाब मलिकांनी अडचणीत येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील राज्यातील ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप केले होते. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT