अनिल देशमुख नवाब मलिक राज्यसभेच्या मतदानाला मुकणार?, ईडी न्यायालयात काय म्हणाली?
मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा मतदानासाठी बाहेर पडू देण्यास ईडीने विरोध दर्शवला आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास मिळावं म्हणून अर्ज केला आहे. त्यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. अशात आता ईडीने मात्र त्यांना विरोध दर्शवला आहे. १० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधल्या कलम […]
ADVERTISEMENT
मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा मतदानासाठी बाहेर पडू देण्यास ईडीने विरोध दर्शवला आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास मिळावं म्हणून अर्ज केला आहे. त्यावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. अशात आता ईडीने मात्र त्यांना विरोध दर्शवला आहे.
ADVERTISEMENT
१० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधल्या कलम ६२ नुसार कैदेत असणाऱ्या व्यक्तीसाठी हा औपचारिक अधिकार आहे तो मुलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे कैदेत असलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी संमती देऊ नये असं ईडीने म्हटलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संमती मिळावी यासाठीचा अर्ज माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतल्या सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. या अर्जाची दखल घेतल कोर्टाने ईडीला दोन्ही अर्जांवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. याविषयी ईडीने आज कोर्टात उत्तर दाखल केलं आहे.
हे वाचलं का?
मंगळवारी ईडीने कोर्टात उत्तर दिलं असून बुधवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणूक १० जूनला होणार आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस रंगली आहे. भाजपची मनधरणी करण्याचा मविआचा प्रयत्न होता. मात्र भाजपने समजुतीचा किंवा तडजोडीचा पर्याय स्वीकारला नाही. त्यामुळे सहाव्या जागेसाठीची चुरस चांगलीच रंगणार यात शंका नाही.
१० जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघआडीला आपल्या पक्षातल्या आमदारांसह अन्य पक्षांमधल्या आमदारांवरही अवलंबून रहावं लागणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मनी लाँड्रींग प्रकरणात तुरुंगात आहेत. तर नवाब मलिकांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित लोकांसह जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेचे सदस्य मतदानासाठी पात्र असतात. मतदान विधानभवनात केलं जातं. त्यामुळे आमदार आणि निवडणूक सदस्य असल्यानं मुभा देण्यात यावी असं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी त्यांच्या अर्जांमध्ये म्हटलं आहे. मात्र ईडीने या दोन्ही अर्जांना विरोध दर्शवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT