मुंबईत ईडीच्या पुन्हा धाडी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि बड्या नेत्यामधला करार रडारवर
ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज मोठा बॉम्ब फोडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. या सगळ्या गरमागरमीत आता ईडीने मुंबईत आणि मुंबई लगतच्या परिसरात छापेमारी सुरू केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळतं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या […]
ADVERTISEMENT

ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज मोठा बॉम्ब फोडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. या सगळ्या गरमागरमीत आता ईडीने मुंबईत आणि मुंबई लगतच्या परिसरात छापेमारी सुरू केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळतं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीचे छापे नुकतेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दाऊद इब्राहिम विरुद्ध नोंदवलेल्या केसच्या संदर्भात आहेत आणि त्या आधारावर ईडीने ECIR देखील नोंदवला आणि तपास सुरू केला. दाऊद भारतभर दहशतवादी कारवाया करत असल्याचे कळल्यानंतर NIA ने दाऊदविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवला. एनआयए अधिकार्यांनी असेही नमूद केले की दाऊदने हवाला चॅनेलद्वारे भारतभर अशांतता निर्माण करण्यासाठी त्याच्यासाठी काम करणाऱ्यांना पैसा पुरवला.
मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची दिवंगत बहीण हसिना पारकर यांच्याशी संबंधित लोकांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. काही काळापूर्वी, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मालमत्तेसाठी मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आणि दिवंगत हसीना पारकरच्या साथीदाराशी मालमत्ता करार करणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्याचे नाव दिले होते. या डीलची एजन्सीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
धारावीचा रहिवासी… ‘दाऊद गँग’ कनेेक्शन… ‘मुंबई’तून निघाला होता दिल्लीला; ATS ची माहिती