पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, एक ठार तर ३० जखमी
आषाढी एकदशी जवळ आल्याने राज्यातल्या सगळ्याच वारकऱ्यांना वारीचे वेध लागले आहेत. अशात पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एका गाडीला भीषण अपघात झाला आहे. या गाडीला आयशर ट्रकरने धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर ३० जण जखमी झाले आहेत. वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी सातार पुणे महामार्गावरच्या शिरवळ खडाळा या […]
ADVERTISEMENT
आषाढी एकदशी जवळ आल्याने राज्यातल्या सगळ्याच वारकऱ्यांना वारीचे वेध लागले आहेत. अशात पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या एका गाडीला भीषण अपघात झाला आहे. या गाडीला आयशर ट्रकरने धडक दिली. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर ३० जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी सातार पुणे महामार्गावरच्या शिरवळ खडाळा या ठिकाणी अपघात झाला. आयशर ट्रकरने या टेम्पो ट्रॉलीला धडक दिली. त्यामुळे हा अपघात होऊन ३० वारकरी जखमी तर एक वारकरी ठार झाला आहे. कोल्हापूरच्या भादोले आणि लाहोटे या गावातील ह.भ.प. वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली असमाऱ्या भद्रेश्वर भाविक मंडळातले वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले होते.
वारकऱ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली शिरवळ या ठिकाणी आली असता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला. धडकेनंतर ट्रकही उलटला. तर ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेले वारकरी बाहेर फेकले गेल. या ट्रॉलीच्या मागचा भागाचा चक्काचूर झाला आहे.
हे वाचलं का?
या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ३० वारकरी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी वारकऱ्यांना तातडीने रूग्णवाहिकेतून खासगी आणि शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सातारा पुणे महामार्गावर खडाळा गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. एक भरधाव आयशर टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. कोल्हापूरच्या भादोले आणि लाहोटे गावातले हए वारकरी होते. पंढरपूर पायी वारीसाठी हे दिंडीसाठी निघाले होते.
ADVERTISEMENT
मंगळवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करेल . रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. बुधवार दि.२२ रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल आणि सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. २३ जूनला देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. शुक्रवार दिं २४ आणि शनिवार दि . २५ रोजी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी राहील.
ADVERTISEMENT
त्यानंतर रविवार दि . २६ रोजी जेजुरी, सोमवार दि. २७ रोजी वाल्हे , मंगळवार दि . २८ व बुधवार दि. २९ रोजी लोणंद येथे दोन दिवस मुक्कामी. त्यानंतर गुरुवार, दि. ३० रोजी तरडगांव , शुक्रवार दि . १ आणि शनिवार २ जुलै रोजी फलटण येथे दोन दिवस मुक्काम. रविवार दि.३ रोजी बरड , सोमवार दि. ४ रोजी नातेपुते , मंगळवार दि . ५ रोजी माळशिरस , बुधवार दि . ६ रोजी वेळापूर, गुरुवार दि . ७ रोजी भंडीशेगाव , शुक्रवार दि. ८ रोजी वाखरी तर शनिवार दि.९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दि . १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे .
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT