एकनाथ खडसेंचा रात्रभर पोलीस ठाण्यात मुक्काम, अधिकाऱ्याच्या टेबलवरच केलं जेवण; काय घडलंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा पोलीस ठाण्यात जेवतानाचे आणि पोलीस ठाण्यातच रात्रभर मुक्काम केल्याचा व्हिडीओ समोर आलेत. त्यामुळे एकनाथ खडसे रात्रभर पोलीस ठाण्यात काय करत होते? खडसे इतके आक्रमक कोणत्या प्रकरणात झाले, असा प्रश्न अनेकांना पडला. तर एकनाथ खडसे आक्रमक होण्याचं कारण आहे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातलं (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) चोरीचं प्रकरणं. याच प्रकरणात खडसेंनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यातच मुक्काम केला.

ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) अधिकाऱ्यांच्या पातळीवर काही दूध पदार्थांची मोठी चोरी झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं स्वतः एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून न हलण्याचा पवित्रा एकनाथ खडसेंनी घेतला आहे.

एकनाथ खडसेंचा आरोप काय?

जळगाव जिल्हा दूध संघात वस्तू चोरी गेल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय. याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीये. एकनाथ शिंदेंनी जळगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी ठिय्या मांडल्यानंतर तक्रार घेण्यात आली. पण गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

हे वाचलं का?

खडसे म्हणाले, “मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की पोलीस यात सावरासारव का करताहेत? आज मी वर्तमानपत्रात पोलीस अधीक्षकांचं निवेदन वाचलं की आर्थिक गुन्हा आहे. ७०० खोके बटरचे चोरीला गेलेत. ३६५ खोके दूध भुकटीचे चोरीला गेलेत. वस्तू चोरीला जाणं हा आर्थिक गुन्हा कसा होऊ शकतो? प्रत्येक चोरी आर्थिक गुन्ह्याचीच असते. कशासाठी एवढी ओढाताण केली जातेय. चोरीची फिर्याद दिलीये, तर अपहार कसं म्हणता. चोरी समजून कारवाई केली असती, तर प्रमुख गुन्हेगार झाले नसते. पोलिसांनीच फरार होण्यासाठी मदत केली, असा आमचा आक्षेप आहे”, असा खडसे म्हणाले.

पोलीस कुठलीही नोंद घेत नसल्यानं एकनाथ खडसेंनी आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांसह आलेल्या एकनाथ खडसेंनी पोलीस ठाण्यात ठाण मांडलं. खडसेंनी पोलीस ठाण्यात जेवण घेतलं. इतकंच नाही, तर मुक्कामही ठाण्यातच केला. त्यामुळे खडसेंचं पोलिसांविरोधातलं आंदोलन चर्चेत आलंय.

ADVERTISEMENT

तक्रारीची पोलिसांकडून पोहोच देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संशयित आरोपींना संरक्षण देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केलाय. पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील गुन्हेगार फरार झालेत. माझ्या बाबतीत अशी स्थिती असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, अशी भूमिका खडसेंनी या प्रकरणात मांडलीये.

ADVERTISEMENT

जयंत पाटील घेणार एकनाथ खडसेंची भेट

तब्बल एक ते दीड कोटी रुपयांची चोरी होते आणि तरीही या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही, असं सांगत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण पोलीस स्टेशन सोडणार नसल्याची भूमिका खडसेंनी घेतलीये. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावमध्ये जाऊन खडसेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT