कर नाही त्याला डर कशाला, योग्य वेळी सी.डी. येईल ! ED चौकशीवरुन Khadse यांचा भाजपला इशारा
भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या पाठीमागे पुन्हा एकदा ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनाही ईडीने भोसरीमधल्या जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. खडसेंचीही या प्रकरणात चौकशी झाली. परंतू कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत योग्य वेळ येताच सी.डी. बाहेर येईल असं म्हणत खडसेंनी भाजपला इशारा दिला आहे. […]
ADVERTISEMENT
भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या पाठीमागे पुन्हा एकदा ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनाही ईडीने भोसरीमधल्या जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. खडसेंचीही या प्रकरणात चौकशी झाली. परंतू कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत योग्य वेळ येताच सी.डी. बाहेर येईल असं म्हणत खडसेंनी भाजपला इशारा दिला आहे.
भाजपला रामराम केल्यानंतर खडसेंनी जाहीर पत्रकार परिषदेत, माझ्यामागे जर ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन असं आव्हान दिलं होतं. जळगावात बोलत असताना खडसेंनी ईडी चौकशीच्या निमीत्ताने थेट भाजपवर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटील यांचा मी आभारी आहे कारण त्यांनी मान्य केलं की त्यांनी माझ्यावर ईडी चौकशी लावली. तुम्ही ईडी लावली की सीडी लावेन असं मी म्हणालो होतो, सीडी योग्य वेळी बाहेर येईल. सीडीची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. त्याचा रिपोर्ट आला की अहवाल मी सादर करेन”, असंही खडसे म्हणाले.
४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर कधीच आक्षेप आलेला नाही. जमिनीसंदर्भात माझ्यावर झालेले आरोप हे हेतूपुरस्कर झाले आहेत. जमिनीच्या व्यवहाराची चौकशी होऊन ACB ने पुण्याच्या कोर्टात अहवाल सादर केला. परंतू यानंतरही ईडीची चौकशी करण्यात येत आहे. कर नाही त्याला डर कशाला म्हणून मी या चौकशीला सामोरं जातोय. महाराष्ट्राच्या विधानसभेतही मी हा प्रश्न वारंवार विचारत होतो की माझा दोष काय आहे. मी दोषी असेन तर मला फासावर लटकवा. जे काही सत्य असेल ते चौकशीतून आणि न्यायालयाच्या माध्यमातून समोर येईल असंही खडसे म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आमच्या पक्षात गैरव्यवहार-भ्रष्टाचारा करणारी माणसं आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कार्यवाही करतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याला उत्तर देताना खडसेंनी चंद्रकांत पाटलांनी आपल्या आजुबाजूला बसलेल्या लोकांकडे पहावं असा सल्ला दिला आहे. त्यामुळे खडसे विरुद्ध भाजपमधला हा वाद आता कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नागपूरमध्ये शिवसेनेला धक्का, १९ वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेले शेखर सावरबांधे NCP मध्ये दाखल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT