सरकार स्थापन होताच उदय सामंतांना एकनाथ शिंदेंचे पहिले गिफ्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिरी: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड केले. आपल्यासोबत शिवसेनेचे 80 टक्के आमदार घेवून शिंदे अगोदर सुरतला गेले त्यानंतर गुवाहटी आणि आता गोव्यामध्ये बंडखोरांचे वास्तव आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकटे महाराष्ट्रामध्ये ये-जा करत आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.

ADVERTISEMENT

शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळात कोण असणार हे अजून अधिकृत समोर आलेले नाही परंतु बंडखोर आमदार आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना एकनाथ शिंदे यांनी मोठे गिफ्ट दिले आहे.

दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) उदय सामंत यांना मोठे गिफ्ट दिले

हे वाचलं का?

उदय सामंत यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. ”रत्नागिरी जिल्ह्याच्यासरकारी वैदयकीय महाविद्यालयाचा (Medical Collage) प्रश्न मार्गी लागणार, पुढच्या वर्षी होणार कॉलेज मध्ये प्रवेश, रत्नागिरीकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होऊन आरोग्य सुविधेत होणार आमूलाग्र बदल, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वैद्यकीय विभागाला आदेश.” अशा आशयाचे ट्विट सामंत यांनी केले आहे. आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर सरकारची जबाबदारी आली आणि दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी उदय सामंत यांना मोठे गिफ्ट दिले आहे.

दरम्यान एक दिवस अगोदर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थीत असलेले उदय सामंत दुसऱ्याच दिवशी गुवाहटीला पोहोचले, त्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. उदय सामंत हे मंत्री तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर रत्नागिरीचे पालकमंत्री पद देखील होते. आदित्य ठाकरेंचे विश्वासू म्हणून उदय सामंत यांना ओेळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंनी काल कृषीबाबत आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला परवानगी दिली आहे.

ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे. माझ्या पाठीत वार करा, आरेचा निर्णय रेटून मुंबईच्या काळजात खंजीर खुपसू नका अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सध्याच्या सरकारला केली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असेही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT