औरंगाबाद : दहावी–बारावी वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० वी आणि १२ वी चे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत. अवश्य वाचा – महाराष्ट्रात ८ हजार ८९८ नवे Corona रूग्ण, […]
ADVERTISEMENT

जिल्ह्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० वी आणि १२ वी चे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत.
अवश्य वाचा – महाराष्ट्रात ८ हजार ८९८ नवे Corona रूग्ण, ६० मृत्यूंची नोंद
महानगरपालिका क्षेत्र वगळून ग्रामीण भागासाठी हे नियम असणार आहेत. पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून…दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक दिवशी थर्मल गन आणि ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करुन नोंद ठेवण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याचसोबत शिक्षकांनाही दर आठवड्याला RTPCR चाचणी करुन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षक किंवा इतर कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर ४ दिवस शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात येईल. यानंतर सर्व शिक्षकांच्या RTPCR चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत शाळा-कॉलेज सुरु करु नये असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अवश्य वाचा – अकोल्यातील कठोर लॉकडाऊनच्या नियमात ‘हे’ बदल
दरम्यान जिल्हा प्रशासनाने शाळांनाही दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थितीचा आग्रह धरु नये असे आदेश दिले आहेत. याव्यतिरीक्त विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मास्क घालणं, सामाजिक अंतर पाळणं आणि सॅनिटायजरचा वापर करुन हात स्वच्छ ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. तसेच शाळा आणि कॉलेजची इमारतही निर्जंतूकीकरण करणं अनिवार्य करण्यात आलंय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि कॉलेजांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
अवश्य वाचा – अमरावती: रुग्णांची संख्या कमी होईना, दिवसभरात सापडले ‘एवढे’ रुग्ण