समजून घ्या : तुम्हाला मिळणारी Corona Vaccine खरी की बोगस? कसं ओळखायचं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत लसीकरणात घोळ झाल्याचं तुमच्याही कानावर आलं असेल…मग तुम्ही जी लस घेताय ती खरोखरच कोरोनाची लस आहे का हे तुम्ही कसं ओळखणार? मुंबईत कांदिवलीमध्ये 390 जणांना कोरोनाची बोगस लस देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर लस घेत असाल, तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, कसं पडताळून पाहिलं पाहिजे? हे आज समजून घ्या.

ADVERTISEMENT

आपण कशी काळजी घेतली पाहिजे?

मला देण्यात येणारी खरोखर लस आहे की पाणी हे मी कसंकाय ओळखणार? पण हे ओळखणं जरी आपल्या हातात नसलं, तरी काही साध्यासोप्या गोष्टी आहेत, ज्या आपण नक्कीच करू शकतो.

हे वाचलं का?

1. आता वॉक इन बऱ्याच ठिकाणी सुरू झालंय, पण शक्यतो कोविन अपवरच नोंदणी करून अपॉईंटमेंट घ्या. जेणेकरून तुम्हाला योग्य ठिकाणीच लस मिळेल.

2. लसीला एका विशिष्ट तापमानातच ठेवावं लागतं, ती वायल उघड्यावर ठेवलेली चालत नाही. त्यामुळे तुम्हाला लस देण्यापूर्वी ती वायल एका विशिष्ट कंटेनर, कोल्ड स्टोरेजमधून काढूनच दिली जातेय ना, हे पाहा.

ADVERTISEMENT

3. लस घेतल्यानंतर सुद्धा सगळ्या गोष्टी मॉनिटर करा. लस घेतल्यानंतर अंगदुखी, जिथे लस घेतली तो हात दुखणं, ताप येणं असे साईडइफेक्ट्स जाणवत आहेत का ते पाहा. सगळ्यांनाच हे साईडइफेक्ट्स जाणवतील असं नाहीत. पण बहुतांश जणांना अशाप्रकारचे साईडइफेक्ट्स जाणवतात.

ADVERTISEMENT

4. वॅक्सीनेशन कॅम्पमध्ये जाऊन लस घेत असाल, तर त्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे ना? कागदोपत्री सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे ना? याची खातरजमा करा.

समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

5. वरवरची ओळख, किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून लगेच कॅम्पमध्ये लस घ्यायला जाऊ नका. प्रत्येक गोष्टी वेरिफाय करून म्हणजेच तुम्हाला लसीकरणासाठी कुणाचा फोन आला असेल, तर या सगळ्या गोष्टी पडताळून पाहा.

6. लसीकरणाचा कॅम्प आयोजित होत असेल, तर संबंधित खाजगी रुग्णालयाकडून, आयोजकाकडून इमेलवर, किंवा लेटरवर तशी माहिती लिहून घ्या. कुणा थर्ड पार्टीला याच्यात आणू नका. डायरेक्ट हॉस्पिटलशीच सगळ्या गोष्टी बोलून घ्या.

7. हाऊसिंग सोसायटीमध्ये जे लसीकरण होतंय, त्याला तिथल्या लोकल बॉडीची परवानगी असणं बंधनकारक असतं. जसं मुंबईत जर एखाद्या सोसायटीमध्ये लसीकरण कॅम्प लावला जात आहे, तर मुंबई महापालिकेची त्याला NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. त्याशिवाय लसीकरण कॅम्प लावता येत नाही. तर याही गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत.

8. तुम्ही लस घेतली आहे, आणि त्यात तुम्हाला काही संशयास्पद वाटत असेल, तर त्याची पोलिसांना तातडीने माहिती द्या, जेणेकरून वेळीच त्यांचं निदान होईल.

लसीचा घोटाळा नेमका काय झालाय, तो सगळ्यात जाणून घ्या

सगळ्यात पहिले जो घोटाळा समोर आला, तो 30 मे 2021 मध्ये मुंबईतल्या कांदिवलीतील उच्चभ्रू हिरानंदानी सोसायटीमध्ये. या सोसायटीमधील 390 रहिवाशांना कोव्हिशिल्डचा डोस देण्यात आला. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीने आपण कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातून आल्याचं सांगितलं, आणि 390 जणांच्या लसीकरणासाठी त्यांने 5 लाख रूपये घेतले. पण कॅम्पवेळी हॉस्पिटलचे बॅनरही लावलेले नव्हते.

– दुसरीकडे लस घेतल्यानंतर कुणालाच दुष्परिणाम सुद्धा जाणवले नाहीत, लस घेतल्यानंतर साधे सेल्फी किंवा फोटोसुद्धा काढू दिले नाहीत. त्यामुळे रहिवाशांना संशय आला. याबाबत कांदिवली पोलिसांकडे FIR दाखल करण्यात आली.

– एक घोटाळा समोर आल्यानंतर अशाप्रकारच्या आणखी केसेस समोर आल्या, आणि बोरीवली, खार आणि वर्सोवा पोलिसांकडेही लसीकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरून FIR दाखल झाल्या.

पण एवढ्यावरच हे थांबलं नाही, तर लसीकरणातील आणखी एक घोळ समोर आलाय. मुंबईतच एक ग्रूप आहे, ज्याने एका फार्मा कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड लसीच्या 38 वायल्स खाजगी हॉस्पिटलमधून मिळवल्या. फार्मा कंपनीतील लोकांना लस दिल्यानंतर रिकामा झालेल्या वायलमध्ये पाणी भरून अनेक ठिकाणी लसीकरण केल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून समोर आलाय. इंडिया टूडेला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

समजून घ्या : कोरोना लसीचे ‘कॉकटेल’ डोस म्हणजे काय?

या सगळ्या घोटाळ्यांमध्ये पोलिसांनी काय कारवाई केली, ती जाणून घ्या :

कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरण घोटाळ्यात 8 जणांना अटक करण्यात आली आहे, आणि त्यांच्याकडून 12 लाखाची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

या घोटाळ्यातील आरोपी महेंद्र सिंह आणि मनीष त्रिपाठी या दोन आरोपींची बँकेची खातीही गोठवण्यात आली आहेत.

जिथून लसीचे डोस घेण्यात आले, त्या शिवम हॉस्पिटलमधील डॉ. पटारिया यांनाही अटक करण्यात आली आहे. कारण हॉस्पिटलच्या रेकॉर्डपेक्षा डोसेसची संख्या जास्त आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या लसीकरण घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक SIT म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम तयार केलेली, आणि त्याचा तपास अजूनही यासंदर्भात सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार सध्या पोलिसांनी ही सगळी कारवाई केली आहे. मुंबई महापालिकेने सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT