Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी महाराष्ट्रात ‘हाच’ मार्ग का निवडला?

भाग्यश्री राऊत

केरळातून सुरू झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून आस्ते कदम पुढे निघालीये. ही यात्रा तब्बल १६ दिवस महाराष्ट्रात असणार आहे. मराठवाड्यातून प्रवेश करून विदर्भामार्गे ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही जातेय. पण, राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातला हाच मार्ग का निवडला? या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केरळातून सुरू झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून आस्ते कदम पुढे निघालीये. ही यात्रा तब्बल १६ दिवस महाराष्ट्रात असणार आहे. मराठवाड्यातून प्रवेश करून विदर्भामार्गे ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही जातेय. पण, राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातला हाच मार्ग का निवडला? या पाच जिल्ह्यातूनच ही यात्रा का जातेय? राहुल गांधींना कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करायचा होता, तर सोलापूर जिल्ह्यातूनही करू शकत होते. पण, त्यांनी नांदेडमधील देगलुरच का निवडलं? महाराष्ट्रातील या मार्गाचं राजकीय महत्वं काय? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा आढावा…

राहुल गांधींनी निवडलेली राज्य पाहिली तर त्यात उत्तर प्रदेश (यूपी), बिहारचा समावेश नाही. या यात्रेत दक्षिणेतील राज्य असू देत किंवा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान… ही राज्य. त्यांच्या यात्रेचा मार्ग पाहिला, तर जिथं काँग्रेसचं अजूनही अस्तित्व आहे, तेच राज्य या यात्रेसाठी निवडण्यात आलेत. ही यात्रा राजकीय नाही, असं काँग्रेस नेते सांगत असले तरी ही २०२४ च्या लोकसभेची तयारी असल्याचं बोललं जातंय.

भारत जोडो यात्रा : राजकीय समीकरणं

महाराष्ट्रात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशात राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील यात्रेचं राजकीय महत्वं काय? त्यांनी मराठवाडा आणि विदर्भाची निवड का केली? हे प्रश्न उपस्तित होणं साहजिकच आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर लोकसभेच्या एकूण जागा आहेत ४८. यात फक्त एकमेव खासदार हा काँग्रेसचा आहे आणि तोही दिलाय विदर्भानं!

हे वाचलं का?

    follow whatsapp