आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, RTO ची रांग आणि व्हायरल झालेली फेसबुक पोस्ट, जाणून घ्या सत्य
सध्याच्या डिजीटल युगात सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र म्हणून ओळखलं जातं. माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आजकाल लहान मुलंही सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःमधले विविध गूण जगभरात दाखवत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचं महत्व इतकं वाढलं आहे की अनेक राजकीय पक्षांनीही फेसबूक असो किंवा ट्विटर…आपल्या पेजच्या माध्यमातून आपली विचारसरणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरुवात केली आहे. परंतू […]
ADVERTISEMENT
सध्याच्या डिजीटल युगात सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र म्हणून ओळखलं जातं. माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आजकाल लहान मुलंही सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःमधले विविध गूण जगभरात दाखवत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचं महत्व इतकं वाढलं आहे की अनेक राजकीय पक्षांनीही फेसबूक असो किंवा ट्विटर…आपल्या पेजच्या माध्यमातून आपली विचारसरणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
परंतू याच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना चुकीची माहिती देण्याचं काम अनेकदा केलं जातं, यात राजकीय पक्षातील नेत्यांच्या समर्थकांच्या नावाने तयार केली जाणारी फॅनपेज आघाडीवर असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता तर विद्यामान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्यासंदर्भातली एक फेसबूक पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे.
तुम्ही फेसबुकवर सक्रीय असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या आरटीओ कार्यालयात रांगेत उभ्या राहिल्याची पोस्ट वाचलीच असेल. शिवसेना भवन या पेजवर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. काय म्हटलंय या फेसबूक पोस्टमध्ये जाणून घ्या….
हे वाचलं का?
या फेसबूक पोस्टला गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच पसंती मिळाली. अनेक शिवसैनिकांनी ही पोस्ट सोशल मीडियावर अभिमानाने शेअरही केली. परंतू हीच पोस्ट दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र या पेजवर शेअर करण्यात आली होती. याच पेजवरच्या मजकुरात योग्य ठिकाणी आवश्यक ते बदल करत शिवसेना भवन या पेजवर ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र या पेजवर काय पोस्ट होती, तुम्हीच पाहा….
ADVERTISEMENT
महत्वाची बाब म्हणजे या पोस्टमध्ये सांगितल्या गेल्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस किंवा सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापैकी कुणाचाही आरटीओ कार्यालयात रांगेत उभारलेला फोटो देण्यात आलेला नाही. अथवा तसा अन्य कुठलाही पुरावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या आणि अशा पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हा मोठाच प्रश्न आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT