वाशिममध्ये बापाचं क्रूर कृत्य! एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, वाशिम

ADVERTISEMENT

वर्षभराच्या एका चिमुकलीला निर्दयी बापाने चक्क खड्डा करुन पुरल्याची भयंकर घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला.

२७ वर्षीय सुरेश प्रभाकर घुगे असं निर्दयी पित्याचं नाव असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील सुरेश घुगे हा आपली पत्नी कावेरी सोबत वाडी वाकद शेतशिवाराततील कोठ्यावर राहत राहतो.

पती-पत्नींना तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणं व्हायची. सुरेशला दारूचं व्यसन जडलेलं आहे. आज दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात सुरेशनं आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली.

ADVERTISEMENT

कावेरी यांनी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे धाव घेतली. त्यांनी गावात जाऊन त्यांच्या दिराला झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर भावकीतील काही माणसं शेताकडे गेली.

ADVERTISEMENT

यावेळी चिमुकली दिसत नसल्यानं त्यांनी सुरेशला विचारणा केली असता, ही हकीकत त्यानं स्वतः सांगितली. त्यानंतर पुरण्यात आलेल्या चिमुकलीला बाहेर काढले.

त्यानंतर घटनेची माहिती रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व आरोपी निर्दयी पिता सुरेश यास अटक केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT