आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा कोयत्याने वार करत खून

मुंबई तक

आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा बापाने कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील पारवडी येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तपासाची चक्र वेगाने हलवत आरोपी बापाला अटक केली आहे. आरोपी बाप मारुती जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावाच्या हद्दीत आला असताना त्याचं आपला सावत्र मुलगा गोपीनाथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा बापाने कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील पारवडी येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तपासाची चक्र वेगाने हलवत आरोपी बापाला अटक केली आहे.

आरोपी बाप मारुती जाधव हा मजुरीसाठी पारवडी गावाच्या हद्दीत आला असताना त्याचं आपला सावत्र मुलगा गोपीनाथ जाधव आणि आपल्या पत्नीसोबत घरगुती कारणावरुन जोरदार भांडण झालं. हे भांडण नंतर इतक विकोपाला गेलं की मारुती जाधवने भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलावर आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर वार करत त्याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरारही झाला.

पोलिसांनी या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीजवळ मोबाईल नसल्यामुळे त्याचा शोध घेणं कठीण होऊन बसलं होतं. तसेच आरोपीच्या नातेवाईकांकडे त्याचा कोणताही फोटो उपलब्ध नसल्यामुळे अडचणींमध्ये आणखीनच भर पडली. यानंतर पोलिसांनी वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर तपास मोहीम राबवली असता झाडीमध्ये आरोपी लपून बसलेला आढळला. अवघ्या ३ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp