दिव्यांग मुलीला रेल्वेत बसवून घरी आला बाप, रिक्षावाल्याच्या सजगतेमुळे उघडकीस आला प्रकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

ADVERTISEMENT

पिंपरी पोलिसांनी आपल्या हद्दीतील एका निर्दयी बापाला गजाआड केलं आहे. आपल्या सात वर्षांच्या दिव्यांग मुलीला रेल्वेमध्ये एकट सोडून पळ काढल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका रिक्षावाल्याच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी पोलिसांनी निर्दयी बापावर कारवाई करत मुलीलाही शोधून काढलं आहे.

जाणून घ्या नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

३४ वर्षीय राजू शेख हे पिंपरी येथील दत्त नगर भागात राहतात. राजू यांची मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिचा सांभाळ करताना त्यांची प्रचंड दमछाक व्हायची. तिचा सांभाळ करताना होत असलेल्या त्रासाला कंटाळून राजू शेख यांनी तिला सोडून देण्याचा विचार केला. यासाठी आपल्या मुलीला सोबत घेऊन राजू शेख पिंपरीवरुन पुणे रेल्वे स्थानकात गेले. राजू यांनी आपल्या मुलीला चेन्नई-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोडून दिलं आणि पुन्हा ते घरी परतले.

रिक्षावाल्याला आला संशय –

ADVERTISEMENT

मुलीला एकट सोडून पळ काढल्यानंतर राजू यांनी त्याच रिक्षातून घरचा प्रवास सुरु केला. यावेळी रिक्षावाल्याला राजू यांच्यासोबत त्यांची मुलगी न दिसल्यामुळे त्याच्या मनात संशय आला. राजू शेख यांना घरी सोडल्यानंतर रिक्षावाल्याने त्याच्या परिचीत असलेल्या आफरीन या महिलेला या घटनेबद्दल माहिती दिली.

ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर ५६ कोटी किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त

आफरीन यांनी राजू शेख यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिलं. यानंतर राजू शेखने आपल्या मुलीला कोणीतरी उचलून नेल्याचं सांगितलं. यानंतर आफरीनने राजू शेख यांना पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही असं विचारलं? इतकच नव्हे तर आफरीन या राजू शेख यांना पिंपरी पोलिसांत घेऊन गेल्या. तिकडे पोलीस चौकशीदरम्यान राजू शेख हे वारंवार आपली उत्तर बदलत होते. यावरुन पोलिसांना संशय आला. अखेरीस पोलिसी खाक्या दाखवला नंतर राजू शेख यांनी आपणच मुलीला एक्स्प्रेस गाडीत बसवून सोडून आल्याचं मान्य केलं.

यानंतर पिंपरी पोलिसांनी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून या घटनेबद्दल माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी मुंबई रेल्वे स्थानकातून या मुलीला ताब्यात घेतलं. यानंतर तिच्या भाऊ-बहिणींच्या सोबत ही मुलगी आता घरी आली असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला भावाचा विरोध, होणाऱ्या नवऱ्यासह बहिणीवरही चाकूने हल्ला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT