सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाच्या पायरसीनंतर झी एन्टरटेनमेंटकडून FIR दाखल
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे सिनेमा फार चर्चेत होता. 13 मे रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला. आणि त्यानंतर पायरेटेड साईट्वर देखील हा सिनेमा लीक झाला. दरम्यान आता राधे सिनेमाच्या पायरसीसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान स्टारर असलेला राधे सिनेमाच्या पायरेटेड व्हर्जनवर झी एंटरटेनमेंट इंटरप्राईजेसकडून सायबर सेलकडे तक्रार […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे सिनेमा फार चर्चेत होता. 13 मे रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला. आणि त्यानंतर पायरेटेड साईट्वर देखील हा सिनेमा लीक झाला. दरम्यान आता राधे सिनेमाच्या पायरसीसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान स्टारर असलेला राधे सिनेमाच्या पायरेटेड व्हर्जनवर झी एंटरटेनमेंट इंटरप्राईजेसकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून त्यासंदर्भात तपास सुरु आहे.
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने देखील राधेच्या पायरसीवर नाराजी व्यक्त केली होती. सलमाने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला होता, “आम्ही पर व्हू 249 इतक्या कमी दरात आमचा ‘राधे’ सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. तरीही काही लोकं पायरेटेड साईट्सवर ‘राधे’ सिनेमाचं बेकायदेशीर प्रक्षेपण करत आहेत. हा एक गंभीर गुन्हा आहे. सायबर सेल या सर्व बेकयदेशीर साईट्सवर कारवाई करत आहे.”
हे वाचलं का?
“प्लीज तुम्ही पायरसीचा भाग बनू नका. असं केल्यास सायबर सेल तुमच्यावरही कारवाई करू शकते. कृपया हे लक्षात घ्या नाहीतर सायबर सेलच्या कारवाईमुळे तुम्ही अडचणीत सापडण्याची शकता आहे.” असंही सलमान म्हणाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT