भाजपची डोकेदुखी वाढली! यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री असलेले यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत.

ADVERTISEMENT

८२ वर्षीय यशवंत सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ते मोदींच्या कार्यपद्धतीवरही नाराज होते. त्यांनी अनेकदा त्यांची नाराजी बोलूनही दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अस्वस्थ होऊन त्यांनी भाजपला जय श्रीराम म्हटलं होतं. त्यानंतर ते सामाजिक कार्यात व्यस्त होते. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा सामूहिक निर्णय घेतले जात असतं. मोदी सत्तेवर आल्यापासून हम करे सो कायदा असा प्रकार वाढला आहे. अकाली दलासारखा मित्र पक्ष मोदींच्या धोरणाला कंटाळून बाजूला गेला आहे. आज भाजपसोबत कोण आहे? ममता बॅनर्जींवर झालेला हल्ला चुकीचा आणि निषेधर्ह होता त्यामुळे मी आता मी टीएमसीत जाणं पसंत करतो आहे असं यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही त्रिवेदी यांनी दिला आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी या त्रिवेदींच्या जागी यशवंत सिन्हा यांची वर्णी लावू शकतात

कोण आहेत यशवंत सिन्हा?

ADVERTISEMENT

यशवंत सिन्हा हे IAS अधिकारी होते. नोकरी सोडून ते राजकारणात आले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. वाजपेयी सरकारमध्ये ते अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्रीही होते. वाजपेयींचे निकटवर्तीय म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मोदींची भूमिका त्यांना पटली नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर त्यांनी सातत्याने टीका केली. त्यांचा मुलगा जयंत सिन्हा भाजप खासदार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT