ठरलं! Kripashankar Singh भाजपमध्ये प्रवेश करणार, मुंबईत काँग्रेसला मोठा झटका

मुंबई तक

मुंबई: कॉंग्रेसचे माजी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह हे बुधवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील युवा नेते रावसाहेब कदम हे देखील बुधवारी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित कृपाशंकर सिंह हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: कॉंग्रेसचे माजी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह हे बुधवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील युवा नेते रावसाहेब कदम हे देखील बुधवारी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी 10 सप्टेंबर 2019 रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविण्यास पाठिंबा दर्शविला होता. तेव्हापासून ते भाजपच्या गोटात जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. ते काँग्रेसच्या तिकिटावर कलिना विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविण्यात आला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर हे भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करतील असं काँग्रेसने त्यावेळी म्हटलं होतं. पण मागील विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलीच नाही.

गेल्या काही महिन्यांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सतत संपर्कात होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp