माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं आज (15 फेब्रुवारी) पुण्यात राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या (16 फेब्रुवारी) सकाळी बाणेरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पुरोगामी विचारवंत, कायदेतज्ज्ञ अशी पी. बी. सावंत यांची ओळख होती. पुण्यात पहिली एल्गार परिषद ही त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली होती.

ADVERTISEMENT

पी. बी. सावंत यांचा अल्प परिचय

30 जून 1930 रोजी पी. बी सावंत यांचा जन्म झाला होता. त्यांनी कायद्याचं शिक्षण (LLB) मुंबई विद्यापीठातून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरु केली होती. साधारण 70 च्या दशकात त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हापासून त्यांनी न्यायदानाचं काम केलं होतं. 1995 साली सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले होते.

हे वाचलं का?

गेल्या काही वर्षांमध्ये ते सामाजिक कार्यामध्ये सक्रीय असल्याचे दिसून आले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात जे मूक मोर्चे काढण्यात आलं त्यावेळी पी. बी. सावंत यांनी या मोर्चांना आपला पाठिंबा देत आरक्षणाची मागणी देखील केली होती. तसंच ते त्यांनी असं मत देखील व्यक्ते केलेलं होतं की, मराठा समाजच्या वतीन जे मोर्चे काढले जात आहेत त्यामुळे एक विशाल क्रांती घडविण्यासाठी मदत होईल.

दरम्यान, पी. बी. सावंत यांच्या मृत्यूमुळे एका पुरोगामी विचारवंताला आणि कायदेतज्ज्ञाला महाराष्ट्र मुकला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT