Jitendra Awhad: “CM एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहित आहे ना? मी हे करू शकत नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ठाण्यातल्या काही योजनांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. त्यानिमित्ताने ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांची ही दोन्ही ट्विट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये?

आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे आमंत्रण दिले महापालिकेनी पण ब्रिज च्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर

माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्या पेक्षा कार्येक्रमाला न गेलेले बर परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही … खरंच कळत नाही ….. चलो ये वक्त भी गुजर जयेगा …… u too brutas अशी दोन ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहेत. जी ट्विट्स चांगलीच चर्चेत आली आहेत.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी मुंब्रा या ठिकाणी उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. याच कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांचीही उपस्थित होती. हा कार्यक्रम जेव्हा पार पडला तेव्हा त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटकही करण्यात आली होती. तसंच नंतर त्यांना जामीनही दिला गेला होता. या सगळ्यावर पत्रकार परिषद घेऊन किती गलिच्छपणे राजकारण सुरू आहे जाणीवपूर्वक कसं खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जातं आहे हे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज केलेली ही दोन ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत.

जातीयवाद राज ठाकरेच पसरवत आहेत

दुसरीकडे मतांच्या ध्रुवीकरणासाठी जातीयवाद पसरवणारा राज ठाकरे हाच एकमेव माणूस आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी शुक्रवारी (२ डिसेंबर) केला होता. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाडांनी हा आरोप केला. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा परिणाम म्हणून काकड आरत्या बंद झाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT