Parambir Singh: परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणीचा गुन्हा आता CID कडे सुपूर्द
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये आता गुन्हा दाखल झाला असून ते प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी पराग मणेरे, बिल्डर संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन आणि एक मनोज घाटकर यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये आता गुन्हा दाखल झाला असून ते प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी पराग मणेरे, बिल्डर संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन आणि एक मनोज घाटकर यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID)कडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला एफआयआर देखील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे.
Maharashtra: Extortion case registered by Thane Police against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh, DCP Parag Manere, builder Sanjay Punamia, businessman Sunil Jain and one Manoj Ghatkar and three officers transferred to state Crime Investigation Department (CID).
— ANI (@ANI) September 27, 2021
नेमकं प्रकरण काय?
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पराग मणेरे हे ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईत बदली झाल्यानंतर पराग मणेरे यांनाही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बढती देण्यात आली होती. पुनामिया आणि जैन यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.