साताऱ्यातील कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तरुणांच्या मारहाणीचा व्हीडिओ आपण अनेकदा पाहिला असेल मात्र साताऱ्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या समोर काल (11 फेब्रुवारी) थेट मुलींच्या दोन गटातील फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. मुलींच्या हाणामारीचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये महाविद्यालयीन युवतींचा गट दिसत असून त्या एकमेकींना बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

जेव्हा मुलींमध्ये ही हाणामारी झाली तेव्हा इतर काही जणांनी त्यांचं मोबाइल शूटिंग करुन नंतर त्याचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले. त्यामुळे काही तासांमध्येच हाणामारीचे हे व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे.

हे पण वाचा : कथा खाकी वर्दीतल्या माणुसकीची, संवेदनशील अधिकाऱ्याची!

हे वाचलं का?

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, ‘मुलींच्या हाणामारीचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या हाणामारीत सहभागी असणाऱ्या मुलींना आम्ही बोलावून घेतलं होतं. तसंच त्यांच्या आई-वडिलांना देखील बोलावलं होतं. यामध्ये जी प्रमुख मुलगी होती जी दोन्ही व्हिडिओमध्ये मारहाण करतान दिसते आहे तिच्याकडून आपण यापुढे चांगली वागणूक असेल अशा स्वरुपाचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आहे. तर दुसरी जी मुलगी आहे तिला समज देऊन सोडण्यात आलं आहे. हे प्रकरण तसं पाहिल्यास किरकोळ आहे. पण यापुढे असं घडता कामा नये अशी समज आम्ही मुलींना दिली आहे. त्यांनी फक्त आपल्या शिक्षणावर लक्ष द्यावं असंच आम्ही त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, जे लोकं हा व्हिडिओ व्हायरल करत आहे त्यांनी असं करु नये.’ असंही पोलिसांनी आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT