पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं. दत्तवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. घरी घेऊन जातो, असं सांगत आरोपींनी पीडितेवर भलत्याच ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुण्यातील जनता वसाहत परिसरात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. २५ वर्षीय पीडित तरुणी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेटवरून आपल्या घरी कात्रजला जात होती. यावेळी तिला चारपैकी एक आरोपी भेटला. ‘तुला घरी सोडतो’, असं म्हणून पीडितेला जनता वसाहतीत घेऊन गेला.

आरोपी पीडित तरुणीला जनता वसाहतीत एका घरात घेऊन आला. तिथे अगोदरच एक आरोपी हजर होता. ती महिला घरात बसल्यावर काही वेळाने आणखी दोन आरोपी घरात आले व त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. आदित्य पवार, दुर्वेश जाधव, श्रीकांत सरोदे आणि आशिष उर्फ राड्या मोहिते अशी अत्याचार करणाऱ्या चार नराधमांची नावं आहेत.

हे वाचलं का?

तरुणी मतिमंद असल्याचा गैरफायदा

२५ वर्षीय पीडित तरुणी मतिमंद असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ती घरी कात्रजला जात होती. तरुणी घरी जात असतानाच आरोपीची तिच्यावर नजर पडली. पीडित तरुणी मतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला ‘घरी सोडतो’ असं म्हणून कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेले.

ADVERTISEMENT

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पर्वती पायथा येथील गल्ली नंबर ८ मधून एका महिलेने फोन करून पोलिसांना सांगितलं की, ‘एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज आहे.’ ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

ADVERTISEMENT

पोलीस आले त्यावेळी तिथे सात-आठ महिला घराजवळ थांबलेल्या होत्या. त्या घराजवळ गेल्यावर पोलिसांनी आतमध्ये असलेल्या महिलेला आवाज दिला. तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता. पण दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर पीडितेसह चार आरोपी घरात असल्याचं पोलिसांना आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित तरुणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर चार आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच हे सर्व आरोपी तेथील परिसरातील असल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT