Jio Offer: एका रिचार्जवर फॅमिली प्लॅनसह मिळवा Amazon-Netflix फ्री
Jio Recharge Offer: मुंबई: रिलायन्स जियोने (Reliance Jio) एक जबरदस्त आणि स्वस्त रिचार्ज ऑफर लाँच केली आहे. जियोच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्सचा पर्याय मिळतो. कंपनी स्वस्त आणि महाग अशा दोन्ही प्रकारचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) ऑफर करते. जर कुटुंबात चार लोक असतील तर, जियोची ही भन्नाट ऑफर तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. कंपनीची हा एक खास प्लॅन […]
ADVERTISEMENT
Jio Recharge Offer: मुंबई: रिलायन्स जियोने (Reliance Jio) एक जबरदस्त आणि स्वस्त रिचार्ज ऑफर लाँच केली आहे. जियोच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन्सचा पर्याय मिळतो. कंपनी स्वस्त आणि महाग अशा दोन्ही प्रकारचे रिचार्ज प्लॅन (Recharge Plan) ऑफर करते. जर कुटुंबात चार लोक असतील तर, जियोची ही भन्नाट ऑफर तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. कंपनीची हा एक खास प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत, एकाच रिचार्जवर मेगा नेटपॅक मिळणार आहे. कुटुंबात एकाच रिचार्जवर नेटसुविधाही मिळणार आहे. (Get Amazon-Netflix Free with Family Plan on Jio Recharge)
ADVERTISEMENT
जियोचा असा फॅमिली प्लॅन आहे, ज्यामध्ये चार लोकांचे फोन काम करू शकतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंग, डेटा, एसएमएससह ओटीटी फायदे म्हणजेच अॅमेझॉन-नेटफ्लिक्स देखील मिळतात.
Jio फॅमिली रिचार्ज प्लॅनविषयी सविस्तर माहिती…
जर कुटुंबातील किंवा इतर लोकांसाठी रिचार्ज प्लॅन हवा असेल तर हा प्लॅन घेता येईल. परंतु, याची मर्यादा 4 लोकांपर्यंत मर्यादित आहे. जियोचा हा प्लॅन पोस्टपेड पोर्टफोलिओचा एक भाग आहे. यासाठी यूजर्सना बिलिंग सायकलमध्ये 999 रुपये खर्च करावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्संना 200 जीबी डेटा मिळतो.
हे वाचलं का?
डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना 500GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते. म्हणजेच पुढील महिन्यात यूजर्स त्यांचा उर्वरित डेटा देखील वापरू शकतात. या प्लॅनमध्ये मुख्य यूजर्सशिवाय, इतर तीन कनेक्शन देखील वापरले जाऊ शकतात. ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस करण्याची सुविधाही मिळते. प्लॅन खरेदी करणारे Jio यूजर्स कंपनीच्या 5G सेवेसाठी देखील पात्र असणार आहे.
जियोच्या फॅमिली रिचार्ज प्लानचे फायदे
जियोच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय यूजर्स अॅमेझॉनचे सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात. प्लॅनमध्ये यूजर्सला एक वर्षासाठी प्राइम व्हिडीओचा अॅक्सेसही मिळेल. यासह यूजर्सना जियो अॅप्सचा अतिरिक्त अॅक्सेस मिळतो. या अंतर्गत यूजर्सना जियो सिनेमा, जियो टिव्ही, जियो क्लाउड आणि जियो सिक्युरिटीमध्ये मोफत अॅक्सेस मिळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT