गोव्यात भाजपला आणखी धक्का! माजी मुख्यमंत्री पार्सेकरांनीही केला ‘रामराम’

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गोवा विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच भाजपला दोन दिवसांत दोन मोठे धक्के बसले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला रामराम केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजपतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे.

गोवा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला लागोपाठ दोन झटके बसले आहेत. उत्पल पर्रिकर यांनी भाजपतून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी भाजप सोडली आहे.

Goa Assembly Election: उत्पल मनोहर पर्रिकरांनी फडकवला भाजपविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष लढणार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राजीनामा दिला असून, पार्सेकरही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘आपण अनेक वर्षापासून भाजप सदस्य राहिलो आहे. पण मला दुर्लक्षित केलं गेलं. त्यामुळे मी आता या पक्षात राहू शकत नाही. मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. काही दिवसांत याची औपचारिक घोषणाही करेन,’ असं लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

उत्पल पर्रिकरांची बंडखोरी, सामना मधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र; काँग्रेसलाही टोमणे

ADVERTISEMENT

‘भाजपत आता कुणीही खुल्यापणाने भूमिका मांडू शकत नाही. बाहेरच्या काही लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे. मनोहर पर्रिकर यांच्या काळात चर्चा करून निर्णय घेतले जायचे. सगळ्यांची मतांची दखल घेतली जायची. पण, भाजपतून ती परंपरा आता संपली आहे’, असं पार्सेकर यांनी म्हटलं आहे.

पार्सेकर यांना तिकीट मिळू नये म्हणून पक्षातूनच तशा पद्धतीची धारणा तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, पार्सेकर यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. ‘आपल्या जागेवर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं. मागील पाच वर्षात कोणतंही काम न करणाऱ्या व्यक्तीला भाजपनं तिकीट दिलं. आफल्या मतदारसंघात अनेक काम अपूर्ण आहेत आणि आपण ती पूर्ण करू अशी लोकांना आशा आहे. मात्र, पक्षाने आपल्याला संधीच दिली नाही,’ असं पार्सेकर यांचं म्हणणं आहे.

माझ्या भवितव्याची चिंता करु नका, मनात भाजप कायम – उत्पल पर्रिकरांनी इतर पक्षांच्या ऑफर धुडकावल्या

भाजप सोडणार असल्यानं पार्सेकर यांनी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं आहे. ‘२०१७मध्ये काँग्रेसला सरकार बनवण्याची संधी होती. भाजपने सत्ता स्थापन करायला नको होती. पण, माझा पराभव झाला असल्यानं मी सरकार न बनवायचं म्हणत असेल, असंच सगळ्यांना वाटलं. माझी भूमिका स्पष्ट होती. काँग्रेसचं सरकार एका वर्षातच कोसळलं असतं आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकलो असतो,’ असंही पार्सेकर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT