Govt Job: निवांत नोकरी, भरघोस पगार... माझगाव डॉकयार्डमध्ये 8वी-10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mazgaon Dock Shipbuilders Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (Mazgaon Dock Shipbuilders) 518 जागांसाठी नोकरीची संधी आहे. ग्रुप ए मध्ये ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर या ट्रेड्सचा समावेश आहे. ग्रुप बी मध्ये  स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, ICTSM, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, RAC, पाईप फिटर, वेल्डर, COPA, कारपेंटर या ट्रेड्सचा समावेश आहे. (government Job for 8th-10th pass in mazgaon dock shipbuilders limited for traid apprentice )

तर, ग्रुप सी मध्ये रिगर, वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) या ट्रेड्सचा समावेश आहे. अशा विविध ट्रेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची परीक्षा 10 ऑगस्ट 2024 रोजी होईल. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

हेही वाचा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू! नेमकं घडलं काय?

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 • ग्रुप A : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

 • ग्रुप B : 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 
 • ग्रुप C : 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • हेही वाचा : 'तुला राजकारणातूनच उठवतो..', जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

   

  वयोमर्यादा

  या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

  ADVERTISEMENT

  • ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  • ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  • ग्रुप C: 14 ते 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

  शुल्क 

  या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ एसईबीसी/ ईडब्ल्यूएस/ एएफसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

  ADVERTISEMENT

  हेही वाचा : ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?

   

  अधिक माहितीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in/ वरून माहिती मिळवू शकता.

  नोकरीची लिंक

  https://mazagondock.in/app/mdlapprentice/Login.aspx

   follow whatsapp

   ADVERTISEMENT