Nandu Natekar Passes Away: महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांच्या निधनानंतर शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

मुंबई तक

पुणे: देशातील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज (28 जुलै) सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 88 वर्ष होतं. पुण्यात त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नंदू नाटेकर हे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. 1956 साली त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं. नंदू नाटेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गौरव आणि दोन मुली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पुणे: देशातील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज (28 जुलै) सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 88 वर्ष होतं. पुण्यात त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नंदू नाटेकर हे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. 1956 साली त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं. नंदू नाटेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गौरव आणि दोन मुली असा परिवार आहे.

दरम्यान, नंदू नाटेकर यांचे पुत्र गौरव नाटेकर यांनी असं म्हटलं आहे की, कोरोनाचं संकट लक्षात घेता शोकसभेचं आयोजन करण्यात येणार नाही. कृपया आपल्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवा.’

नंदू नाटेकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केलं आहे.

‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू श्री. नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू. नाटेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!’

हे वाचलं का?