Gauri Khan : शाहरूखच्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

FIR filed against Shah Rukh Khans Wife Gauri Khan: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan Wife) याची पत्नी आणि डिझायनर गौरी खान (Gauri Khan) हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण गौरी खानविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (विश्वास भंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रॉपर्टीवरून तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील रहिवासी जसवंत शहा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर गौरी खानच्या अडचणी वाढल्या आहेत. (guari khan legal troble fir lodged against shah rukh khan wife in lucknow)

ADVERTISEMENT

Kasba Peth: कसब्यात कोण मारणार बाजी?

प्रकरण काय?

शाहरूख खानची पत्नी आणि डिझायनर गौरी खान (Gauri Khan) हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील रहिवासी जसवंत शहा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, ज्या कंपनीची गौरी खान ब्रॅंड अॅम्बेसेडर होती, त्या कंपनीत त्यांनी 86 लाख रूपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. मात्र या फ्लॅटचा ताबा अद्याप त्यांना देण्यात आला नव्हता. याउलट लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरातील तुलसियानी गोल्फ व्ह्यूमध्ये असलेला फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप शहा यांनी केला होता. या घटनेमुळेच शहा यांनी गौरीसह इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

तक्रारदार जसवंत शहा यांच्या तक्रारीनंतर शाहरुख खानची पत्नी आणि डिझायनर गौरी खानविरोधात (Gauri Khan) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गौरीशिवाय तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे ​​मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी (mahesh Tulsiyani) यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर गौरीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (विश्वास भंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते काय माफी मागतील’, कोण म्हणालं?

ADVERTISEMENT

…म्हणून गौरी अडकली प्रकरणात

या घटनेतील विशेष बाब म्हणजे, तक्रारदार जसवंत शहा ज्या ईमारतीत फ्लॅट खरेदी करत होते. त्या प्रोजेक्टची ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान होती. आणि गौरी खानच्या प्रभावामुळे त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र त्यांना आता हा फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्यांनी ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खानसह तुलसियानी कन्स्ट्रक्शनचे अनिल कुमार आणि संचालक महेश तुलसियानी (mahesh Tulsiyani) यांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे आता गोरी खानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT